मुंबईमध्ये नसरापूरची पुनरावृत्ती! पायधुनीमध्ये चिमुरडीवरवर वॉचमनकडून अत्याचार

Mumbai girl sexually assaulted by watchman मुंबईतील पायधुनीमध्ये देखील एका आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संताप जनक घटना घडली आहे.

Mumbai Girl Sexually Assaulted By Watchman

Mumbai Girl Sexually Assaulted By Watchman

Nasrapur incident repeated in Mumbai 8-year-old girl sexually assaulted by watchman : गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये घडलेली भोरमधील नसरापूर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता मुंबईतील पायधुनीमध्ये देखील अशाच प्रकारे एका आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संताप जनक घटना घडली आहे.

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना! पबमध्ये लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू 60 हून अधिक गंभीर

पायधुनी परिसरात एका इमारतीच्या सुरक्षारक्षकानेच हा गैरप्रकार केल्याचं समोर आहे. ही चिमुकली इमारतीमधील शौचालयात गेली असताना या नराधमाने पीडितेवर अत्याचार केला. या संतापजनक घटनेनंतर पीडित मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सून पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान या घटनेमुळे परिसरातील परिसरामध्ये संतपाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. हे प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचं निधन; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

याबाबत माहिती देताना डीसीपी विजयकांत सागर यांनी सांगितलं की, पायधुनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दुपारी त्यांना एक फोन आला होता, ज्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळाली, त्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपीला ताब्यात घेतलं. त्यावर रीतसर एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version