Navi Mumbai Metro : नवी मुंबईतील नागरिक गेल्या अनेक महिन्यापासून नवी मुंबई मेट्रोच्या (Navi Mumbai Metro) उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. मेट्रोचं उ्दघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार होतं. मात्र ते झालं नाही. दरम्यान, उद्घाटनामुळं रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोला अखेर मुहूर्त सापडला आहे. कोणत्याही औपचारिक उद्घाटन सोहळ्याशिवाय ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे. उद्यापासून ( 17 नोव्हेंबरपासून) नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधरपर्यंत मेट्रो सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
South Africa : ‘चोकर्स’ म्हणजे काय? दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमला हा टॅग का मिळाला?
नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच महिन्यात होणार होते, मात्र यावर्षी एप्रिलमध्ये उष्माघातामुळे झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. त्यानंतर कोणत्याही अधिकृत उद्घाटनाशिवाय ही मेट्रो सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरात लवकर मेट्रो सुरू करावी, अशा सूचना महाराष्ट्र शासनाने सिडकोला दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे.
Maratha Reservation: तुम्ही एक भुजबळ पाडाल, तर आम्ही 160 आमदार पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा
याविषयी बोलतांना सिडकोचे संचालक अनिल डिग्गीकर यांनी सांगितले की, नागरिकांची गैरसोय होऊ नये. त्यासाठी औपचारिक उद्घाटनाची वाट न पाहता तातडीने मेट्रो सेवा सुरू करण्याचे निर्देश सिडकोला देण्यात आले. त्यानुसार 17 नोव्हेंबरपासून मेट्रो सेवा सुरू होत आहे.
ही मेट्रो सेवा 17 नोव्हेंबर 2023 रोजी पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान, दुपारी 3 वाजता सुरू होईल आणि शेवटची फेरी रात्री 10 वाजता असणार आहे. तर 18 नोव्हेंबर 2023 पासून पहिली मेट्रो पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंदरपर्यंत सकाळी 6 वाजता धावेल आणि दोन्ही बाजकडून मेट्रोची शेवटची फेरी रात्री 10 वाजता असेल.
या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या तिकिटांचे भाडे 0 ते 2 किमीच्या टप्प्यासाठीच्या 10 रुपये असणार आहेत. तर 2 ते 4 किमीसाठी रु. 15 आणि 4 ते 6 किमीसाठी रु. 20, 6 ते 8 किमीसाठी रु. 25, 8 ते 10 किमीसाठी रु. 30 आणि 10 किमी पेक्षा जास्त अंतरासाठी रु. 40.