Download App

राणा दाम्पत्याला कोर्टाचा मोठा धक्का, हनुमान चालिसाप्रकरणी याचिका फेटाळली

Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण केल्याप्रकरणी कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण आंदोलनप्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याने गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. ती याचिका आता कोर्टाने फेटाळली आहे. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

एफआयआर दाखल होण्यापूर्वी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा नवनीत राणा यांचा दावा होता. हा दावा फेटाळत अतिरीक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपला निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज हा निकाल जाहीर केला.

‘आरोग्य विभागात बदल्यांचं मोठं रॅकेट सुरु’; विजय वडेट्टीवारांनी सगळंच केलं उघड

पुढील सुनावणीत कोर्टाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी आता 5 जानेवारीला आरोप निश्चित केले जाणार आहेत. दोषमुक्ती याचिका फेटाळल्यानंतर कोर्टाकडून खटल्याच्या कारवाईला सुरुवात होणार आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी जाहीर केलं होतं. यासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर राणा दाम्पत्याला कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचं कारण सांगत मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती.

Manoj Jarange : शिंदेंची फेब्रुवारीची मुदत मान्य नाही; मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं…

राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी आंदोलनाच्या दिवशी संध्याकाळी या प्रकरणी अटक केली होती. त्यांना वांद्रे दंडाधिकारी कोर्टापुढे हजर केलं होतं. त्यावेळी कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर राणा दाम्पत्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. पुढं मुंबई सत्र न्यायालयानं या दोघांना जामीन मंजूर केला होता.

follow us