Navy sailor ends his life along with his wife and two children in Mumbai : मुंबईतील कुलाबा येथे नेव्ही नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे नौदलातील एका जवानाने पत्नी आणि दोन मुलांसह जीवन संपवल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. जवानाच्या वडिलांनी फोन केला असता कोणताही प्रतिसाद न मिळास्याने ही घटना उघडकीस आली आहे.
एसआयआर फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस; महाराष्ट्रात बंगाल पॅटर्न वापरण्याचा कट रोहित पवारांचा आरोप
दरम्यान या जवानाच्या वडिलांनी केलेल्या कॉलला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी नौदलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली असता कर्मचाऱ्यांनी जवानाचं घरं गाठलं असता तेथे जवान गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर पत्न अन् दोन मुलं बेशुद्ध अवस्थेत होते. यावेळी त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
खाकीची शान! एमआयडीसीचे हेमंत थोरात व राजू सुद्रिक यांना मानाचे ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान
पुरणलाल मेहरा असं या 30 वर्षीय जवानाचं नाव असून पत्नी ओमा तीम वर्षांचा मुलगा यश आणि दोन महिन्यांच्या बाळाचा या मृतांमध्ये समावेश आहे. या जवानाने अगोदर पत्नी आणि मुलांना जेवणातून विष दिले त्यानंतर स्वत: गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. कफ परेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
तसेच या जवानाने त्याच्या कुटुंबासह स्वत: ला का संपवलं याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. कारण या घटनास्थळी अशा प्रकारची कोणतीही चिठ्ठि सापडलेली नाही. मात्र या जवानाने त्याच्या वडिलांना शेवटचा धक्कादायक मेसेज केल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की, आमचे मृतदेह घेऊन जा या मेसेजचाही तपास पोलीस करत आहेत.
