Download App

Nawab Malik : नवाब मलिक रुग्णालयातून बाहेर, राष्ट्रवादीचे दोन्ही गटाकडून स्वागत…

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना वैद्यकीय कारणासाठी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक नूकतेच मुंबईतील कोहिनूर हॉस्पिटलमधून बाहेर पडले आहेत. मलिक रुग्णालयाबाहेर येताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून हा जल्लोष साजरा केला आहे.

NIA RAIDS :राज्यात चार ठिकाणी एनआयएची छापेमारी ! कोल्हापूरातून तिघे ताब्यात, कागदपत्रे हाती

नवाब मलिक यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर नवाब मलिक यांची रुग्णालयात तपासणी करण्यात आली. याचवेळी रुग्णालयाबाहेर नवाब मलिक यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्यानंतर नवाब मलिक रुग्णालयातून बाहेर येताच कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी करत जंगी स्वागत केलं आहे.

नवाब मलिक कोणत्या गटात? सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं

मलिक बाहेर येताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. यावेळी “कोण आला रे कोण आला, राष्ट्रवादीचा वाघ आला.., नवाब मलिक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या.

पवारांच्या लेकीची खासदारकी जाणार? बारामतीच्या किल्ल्यावर मित्रपक्षानेच ठोकला दावा

दरम्यान, नवाब मलिक गेल्या दीड वर्षांपासून तुरुंगात होते. कथिक गैरव्यवहार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ते तुरुंगात होते. ED ने मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्याशी संबंधित मालमत्तांच्या खरेदीत पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.

ईडीकडून 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून कुर्ला येथील जमीन खरेदी प्रकरणात पैशांच्या व्यवहाराच्या आरोपावरून ईडीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी नवाब मलिकला यांना अटक करण्यात आली होती.

Tags

follow us