NIA RAIDS :राज्यात चार ठिकाणी एनआयएची छापेमारी ! कोल्हापूरातून तिघे ताब्यात, कागदपत्रे हाती

  • Written By: Last Updated:
NIA RAIDS :राज्यात चार ठिकाणी एनआयएची छापेमारी ! कोल्हापूरातून तिघे ताब्यात, कागदपत्रे हाती

मुंबईः राज्यामध्ये दहशतवादी संघटनेशी काहींचा संबंध आढळून आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) छापेमारी करण्यात येत आहे. एनआयएकडून नाशिक, कोल्हापूर, मालेगाव व बीड जिल्ह्यात छापेमारी करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातून तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच छापेमारीत काही महत्त्वाची कागदपत्रेही एनआयएच्या हाती लागली आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर बच्चू कडूंचाही शरद पवारांबाबत मोठा दावा

पुणे आयसिस मॉड्युल प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात एनआयएने पाच जणांना अटक केलेली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका डॉक्टरचा समावेश. तो तरुणांना आयसिसमध्ये भरती करण्यासाठी मदत करत होता. तर ठाणे येथून अटक केलेला एक संशयित हा बॉम्बस्फोटाचे प्रशिक्षण घेत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहेत.

नवाब मलिक कोणत्या गटात? सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं

त्याचबरोबर राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ही संघटनाही कार्यरत आहे. ही संघटना तरुणांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देत असल्याच्या संशयावरून एएनआयने छापेमारी सुरू केली आहे. बीड, नाशिक, मालेगाव, कोल्हापूर जिल्ह्यात छापेमारी केली आहे. कोल्हापूरमधून तीन संशयतींना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडे काही कागदपत्रे आढळून आले आहेत.

देशभरात चौदा ठिकाणी छापेमारी
एनआयएने महाराष्ट्राबरोबर केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहारमधील 14 ठिकाणी छापेमारी केली आहे. पीएफआयच्या एंजटकडून तरुणांना दहशतवादी मार्गाला लावण्यासाठी शस्त्राचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे संशयावरून ही छापेमारी करण्यात आली आहे. कन्नूर, दक्षिण कन्नड, मुर्शिदाबाद, कटियार येथे ही छापेमारी झालेली आहे. त्यात विविध कागदपत्रांसह डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घातपात घडविण्याची शक्यता असल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणा या कामाला लागल्या आहेत. तसेच राज्यातील पोलिस यंत्रणाही अलर्ट झालेल्या आहेत. पोलिस यंत्रणेकडून मोठ्या शहरांमध्ये पोलिस सुरक्षा वाढविण्यात आलेल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube