मोठी बातमी; नवाब मलिक अचानक अजितदादांच्या भेटीला, ‘देवगिरी’वर खलबतं

Ajit Pawar : नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार नवाब मलिक (Navab Malik) यांच्या सभागृहात बसण्यावरुन मोठा वाद पेटला होता. आता अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा देवगिरी बंगल्यावर नवाब मलिक पोहचले आहेत. अजित पवारांच्या निवासस्थानी सुनील तटकरे (Sunil Tatakare) देखील उपस्थित आहेत. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. जेलमधून बाहेर […]

Navab Malik

Navab Malik

Ajit Pawar : नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार नवाब मलिक (Navab Malik) यांच्या सभागृहात बसण्यावरुन मोठा वाद पेटला होता. आता अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा देवगिरी बंगल्यावर नवाब मलिक पोहचले आहेत. अजित पवारांच्या निवासस्थानी सुनील तटकरे (Sunil Tatakare) देखील उपस्थित आहेत. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

जेलमधून बाहेर आल्यापासून नवाब मलिक यांनी आपण कोणत्या गटात आहोत हे जाहीर केलेले नाही. परंतु हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी यांच्या बाकावर बसले होते. त्यानंतर विरोधकांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांना महायुतीत घेण्याला विरोध केला होता. फडणवीसांनी सोशल मीडियावर खुले पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होते.

सरकारी यंत्रणांकडून सुरु असलेल्या चौकशा आणि आरोपांतून नवाब मलिक निर्दोष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांना महायुतीत सामील करू नका, असे म्हटले होते. फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार गटाने नवाब मलिक यांच्यापासून अंतर ठेवले होते. मलिक यांनीही आपण कोणत्या गटात आहोत हे देखील जाहीर केले नव्हते. त्यामुळे मलिक कोणाचे असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला होता.

Shirur Loksabha अजितदादांकडे गेल्यास आढळरावही अजितदादांच्या गटात जाणार? म्हणाले चर्चेला अजून…

आगामी लोकसभा निवडणुकीदृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनिल तटकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीदरम्यान नवाब मलिक देवगिरीवर दाखल झाले आहेत. त्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version