Download App

नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांनी शोधला भिडू; अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला दिलं तिकीट

अनुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. फहाद अहमद हे समाजवादी पक्षातील नेते होते. पण त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

  • Written By: Last Updated:

Sana Malik vs Fahad Ahmed from Anushaktinagar : विधानसभा निवडणुकांसाठी महत्वाच्या आणि उत्सुकता लागलेल्या मतदारसंघात उमेदवारांची नावं घोषित केली जात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (Sana Malik) नवाब मलिक यांच्या कन्येला अनुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. आता, सना मलिक यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने फहाद अहमद यांना अनुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. फहाद अहमद हे समाजवादी पक्षातील नेते होते. पण त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊनच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कराचे पती आहेत.

अनुशक्तीनगर मतदारसंघात आमच्याकडे खूप चांगले कार्यकर्ते आहेत. मात्र, फहाद अहमद हे काही महिन्यांपासून तिकडे स्थानिक आहेत. या उमेदवारीसाठी तेथील निष्ठावंत नाराज आहेत. मात्र, राजकारणात संख्येला महत्त्व आहे, असं म्हणत फहाद अहमद यांच्या उमेदवारीचं जयंत पाटील यांनी समर्थन केलं आहे. तसंच, फहाद हे राष्ट्रवादीकडून लढणार का?, या प्रश्नावरही जयंत पाटील यांनी स्पष्टपणे उत्तर दिलंय. मी आज राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्यांचा पक्षप्रवेश करूनच मी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात दिला तगडा उमेदवार

 

Tags

follow us