NCB takes major action bringing Salim Dola from Turkey Cocaine worth Rs 1,745 crore seized in Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचं भांड फोडलं आहे. यामध्ये मुंबईतून 1745 कोटी रुपयांचे तब्बल 4 00 349 किलो हायग्रेड कोकेन जप्त करण्यात आलेले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर या कारवाईची माहिती देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं की आम्ही पूर्णपणे नष्ट करण्यासाठी समर्थक आहोत. त्याचबरोबर ते म्हणाले की नार्कोटिक्स ब्युरोने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याचबरोबर त्यांनी या कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक देखील केले. त्यांनी म्हटलं हा उच्चदृष्टिकोनाचं एक उत्तम उदाहरण आहे.
भुवनेश्वर कुमारसमोर जोस बटलर पुन्हा फेल! टी-20 मध्ये नऊवेळा केली शिकार
ज्यामध्ये एजन्सीने एका छोट्या धाग्यापासून मोठं जाळ निर्माण करत हे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणलं आहे. या कामगिरीसाठी मी एनसीबीच्या टीमचं अभिनंदन करतो. दरम्यान या अगोदरच गेल्या काही दिवसांपूर्वी तुर्की वरून सलीम डोला याला भारतात आणलं होतं. सलीम डोला एक आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर आहे. त्याचबरोबर तो आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा सहकारी देखील आहे.
