चाल उनकी चल सकते है क्या आप; शायराना अंदाजात भुजबळांनी गाजवलं ‘षण्मुखानंद’

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे कधी कुणावर त्यांच्या स्टाईलने भाष्य करतील याचा काही नेम नाही. आजही त्याचाच प्रत्यय आला. राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करत जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या या फटकेबाजीने राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकच बहर आली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित […]

Letsupp Image   2023 06 21T170809.592

Letsupp Image 2023 06 21T170809.592

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे कधी कुणावर त्यांच्या स्टाईलने भाष्य करतील याचा काही नेम नाही. आजही त्याचाच प्रत्यय आला. राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करत जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या या फटकेबाजीने राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकच बहर आली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील चाणक्य म्हणून सर्वांना परिचित आहेत. सर्वच स्तरातून त्यांच्या राजकीय चातुर्याची प्रशंसा केली जाते. यात भाजपसह अन्य पक्षातील वरिष्ठ नेत्यांचाही समावेश आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील शरद पवारांचे कौतुकाचे गोडवे गायले आहेत.काही वर्षांपूर्वी मोदींनी आपण पवारांचं बोट धरून राजकारणाचे धडे गिरवल्याचे म्हटले होते.

महागाई, बरोजगारीवरुन खासदार कोल्हेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

याच गोष्टीचा पुनरूच्चार करत भुजबळांनी मोदींवर शेरोशायरीच्या अंदाजातून जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पवार साहेब लहान सहान घटकांसाठी ते दिव्यासारखे रात्रंदिवस जळत असतात. गोरगरिबांचे कष्ट पाहताना ते मेणासारखे विरघळत असतात. तुम्ही त्यांचे बोट धरून काय शिकलात असे म्हणत भुजबळांनी एक शायरी ऐकवली.

गद्दारी करायची असती तर राज ठाकरेसोबत केली असती, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल

“उनके जैसे चिराग बनके क्या जल सकोगे आप, क्या मोम बन के क्या पिघल सकोगे आप”, असे भुजबळ म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, “जुते तो आप उनके पेहन सकते हो, मगर चाल उनकी चल सकते हो क्या आप”, असे म्हणत भुजबळांनी शेरोशायरीतून मोदींवर निशाणा साधला.

Exit mobile version