प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) रडारवर आले आहेत. आज (सोमवारी 22) मे रोजी त्यांची ईडीने कसून चौकशी केली. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (IL&FS) कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पाटील यांची चौकशी होत आहे. आयएल आणि एफएलएस ही एक फायनान्स कंपनी आहे. ही कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकाआणि विमा कंपन्यांनी तयार केली आहे. (Jayant Patil Enquiry
पाटील यांच्या रुपाने ईडीच्या रडारवर आलेले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नववे नेते आहेत. यापूर्वी शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, एकनाथ खडसे हे नेते ईडीच्या रडारवर आले आहेत. यातील छगन भुजबळ , नवाब मलिक, अनिल देशमुख हे वर्षभर किंवा त्यापेक्षा अधिक दिवस कारागृहातही जाऊन आले आहेत. यानंतर या नेत्यांनी कारागृह नक्की कसे असते, काय-काय होते याचे वर्णन सांगितलं आहे. त्यामुळेच कारागृहाबद्दल सर्वच नेत्यांच्या मनात एक प्रकारची भीती बसली आहे. यातूनच ‘ईडी’ नको रे बाबा असा सूर सर्वत्र दिसतो.
आज चौकशीला जाताना जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर देखील ही भीती काहीशी जाणवतं होती. त्यांच्या आवाजात कंप होता. जयंत पाटील राजकियदृष्टया आक्रमक दिसत असले तरी ते अत्यंत मृदू स्वभावाचे आहेत. तसेच देवावर श्रद्धा असलेले नेते म्हणून पाटील यांची ओळख आहे. ते पुट्टपर्थीच्या सत्यसाई बाबांचे निस्सिम भक्त आहेत. एका अपघातातून बचावल्यानंतर त्यांची श्रद्धी आणि विश्वास अधिक घट्ट झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये पाटील यांना रॉयल स्टोन बंगला मिळाला होता. या ठिकाणी बैठक हॉलमध्ये सत्यसाई यांची विशेष पूजा केली जायची. तसंच मोठा फोटो आणि मूर्ती देखील होती. त्यांनी त्यांची भक्ती कधीही लपवून ठेवली नाही.
यातूनच आज जयंत पाटील यांनी जेव्हा ईडीच्या कार्यालयात प्रवेश केला तेव्हा त्यांनी एका भिंतींवर स्तोत्र किंवा मंत्र लिहला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्यावेळी जयंत पाटील हे आपल्या समर्थकांसोबत कार्यालयात गेले, तेव्हा त्यांना पहिल्या मजल्यावर बोलवण्यात आले. जयंत पाटिल आपल्या समर्थकांसह वरच्या मजल्यावर गेले होते. तिथून त्यांना खालच्या मजल्यावर पाठवण्यात आले.
जयंत पाटील जिन्यावरून खाली येत असताना त्यांनी त्यांच्या हातात आणलेला एका वस्तूच्या साहाय्याने माध्यमातून जिन्यावर काहीतरी लिहालं असल्याचं स्पष्टपणे दिसून आले. लिहिल्यानंतर ते तिथून तात्काळ पुढेही गेले. जयंत पाटील यांनी या भिंतींवर काय लिहले? नक्की काही मंत्र लिहला का? की काही संदेश लिहला? हे लिहायला त्यांना कोणी सांगितलं? असे अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत.