Nikhil Wagle On Modi Sarkar : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. वर्षभरापासून मी अनेक लोकांशी बोलत आहे. मी स्वतः अस्वस्थ आहे. हा जो काळ आहे तो अस्वस्थतेचा काळ आहे. जे गेल्या आठ वर्षात या मोदी सरकारने (Modi Sarkar) केलंय. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी लेट्सअप विशेष (Letsup special)कार्यक्रमात केला आहे.
बावनकुळेंकडे झेंडा अन् दुपट्टा तयार; राष्ट्रवादीच्या नेत्याची पाहतायत वाट
निखिल वागळेंनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी लेट्सअप विशेष कार्यक्रमात त्यांनी विविध प्रश्नांची परखडपणे उत्तरं दिली आहेत. निर्भय बनो या आंदोलनाची गरज का वाटते असा प्रश्न वागळेंना विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून मी अनेक लोकांशी बोलत आहे. आणि मी स्वतः अस्वस्थ आहे. हा जो काळ आहे, अस्वस्थतेचा काळ आहे.
गेल्या आठ वर्षात जे काही या मोदी सरकारने केलंय, अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. लोकशाहीला धोकादायक गोष्टी केल्या आहेत. सरकारपासून मीडियापर्यंत लोकशाहीचे चार खांब तुम्ही जर पाहात असाल तर लोकशाहीच्या प्रत्येक खांबावर मोदी सरकारने हल्ला केला आहे. त्यांनी आत्तापर्यंत आणीबाणी आणली नाही पण ही अघोषित आणीबाणी असल्याची घणाघाती टीका निखिल वागळे यांनी मोदी सरकारवर केली आहे.
ते म्हणाले की, कार्यकर्ते आहेत त्यात सफूरा जरगर नावाची एक कार्यकर्ता आहे. ती अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहे. किंवा केरळचा एक पत्रकार अनेक दिवस जेलमध्ये होता. एनआरसीच्या वेळी अनेक लोकांना त्यांनी पकडून जेलमध्ये टाकले होते. तर हे दबंग चाललेलं आहे. अनेक लोकांशी बोलत आहे. त्याच्यावरुन माझ्या असं लक्षात आलं आहे की, लोकांना मनातून काहीतरी म्हणायचंय. पण लोकं घाबरलेली आहेत. लोकं दहशतीखाली आहेत. आपल्याला जेलमध्ये टाकतील काय? विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जी ईडी, सीबीआयची धाड पडतेय, तर सामान्य माणसाचं काय करणार, असाही सवाल यावेळी वागळेंनी उपस्थित केला आहे.
वागळे म्हणाले की, मी असं वर्षभर अनेक लोकांशी बोलतो आहे, मी पुण्यामध्येही अनेकांशी बोललो, विश्वंभर चौधरी आहेत, कोल्हापूरचे कार्यकर्त्यांशी बोललो. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, पुन्हा एकदा निर्भय बनवू सुरु करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा अशासाठी की, आम्ही निर्भय बनवू आंदोलन चालवलं होतं ते 1991, 92, 93 ला ज्यावेळी दंगली आणि बॉम्बस्फोट मुंबईमध्ये झाले होते.
मुंबईमध्ये दहशतीचं वातावरण होतं. आणि आम्ही असं ठरवलं की, हे दहशतीचं वातावरण तोडायचं. लोकांना भितीमुक्त करायचं. वसती-वसतीत जाऊन सभा घेतल्या. त्यावेळी आम्ही सांगायचो की, या दंगली दाऊद इब्राहीमने केलेले आहेत. दंगल घडवणाऱ्यांनी दंगर घडवली आहे. पण आता आपल्याला यातून बाहेर पडलं पाहिजे. आणि समान्य माणसासारखं जीवन जगलं पाहिजे. याचं कारण दहशतीखाली आपण जर जगलं तर सगळच खुंटेल. स्वातंत्र्य हा माणसाच्या जगण्याचा श्वास आहे.
तर त्यामुळे आम्ही ते गल्ली-बोळात जाऊन सांगायचो. त्याचा मला वाटतं उपयोग झाला माणसांना मोकळं व्हायला. मला वाटतं आजही हे करण्याची गरज आहे. आणि पहिला जो अजेंडा आहे, तो मोदी सरकारने जे अत्याचार चालवलेत ते लोकांपर्यंत देणे. कारण ते मीडिया आता दाखवत नाही. पहिला अजेंडा जो आहे ते सत्ताधाऱ्यांनी जे अत्याचार चालवलेले आहेत, त्याची माहिती लोकांना देणे. त्यामुळे पुन्हा एकदा मी पत्रकार म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये जाणार आहे, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी लेट्सअप विशेष कार्यक्रमातून दिला आहे.