Gulabrao Patil : भाऊ नको मला पाणीवाला बाबा व्हायचंय…

पुणे : गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत ‘मला लोक प्रेमाने भाऊ म्हणतात. पण मला भाऊ व्हायचे नाही, तर मला पाणीवाला बाबा व्हायचे आहे. कारण पाणी पाजणे हे पुण्याचे काम असून, ते आपल्याला करायचे आहे. ‘वर दाढीवाला, इथे मंत्री दाढीवाला आणि सचिवही दाढीवाला’ असे म्हणत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मंत्री गुलाबराव पाटील […]

Untitled Design

Untitled Design

पुणे : गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत ‘मला लोक प्रेमाने भाऊ म्हणतात. पण मला भाऊ व्हायचे नाही, तर मला पाणीवाला बाबा व्हायचे आहे. कारण पाणी पाजणे हे पुण्याचे काम असून, ते आपल्याला करायचे आहे.

‘वर दाढीवाला, इथे मंत्री दाढीवाला आणि सचिवही दाढीवाला’ असे म्हणत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मंत्री गुलाबराव पाटील आणि विभागात प्रधान सचिव संजीव जैसवाल अशी जोडी जमल्याची टिपण्णी केली. जैसवाल व कृष्णा यांच्याकडे पाहत हा प्रज्ञावंताचा मेळा आहे. मी काही इतका शिकलेलो किंवा हुशार नाही, पण तुमच्यासमवेत बसून तज्ज्ञता येते. त्यामुळे जनतेला पाणी देण्यासाठी आपण एकत्रित काम करू असे, पाटील यांनी मिश्कीलपणे नमूद केले.

पाणी व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान, विकास, नियोजन यासाठी कार्यरत इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या (आयवा) तीन दिवसीय ५५ व्या अखिल भारतीय वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

Exit mobile version