OBC strike in Mumbai after Dasara Fesvial like Maratha Cummunity : गणेशोत्सावामध्ये मराठा समाजाने मुंबईमध्ये आंदोलन आणि उपोषण केलं. त्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर जारी केला. त्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठा समाजानंतर ओबीसीही दसऱ्यानंतर मुंबईत धडकणार आहे. आज याबाबत एक बैठक होणार आहे. त्यामध्ये या मोर्चाची तारिख निश्चित होणार आहे.
मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजाचा मुंबईमध्ये महामोर्चा होणार आहे. दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये हा ओबीसींचा मोर्चा येणार आहे. यासाठी आज गुरूवारी ओबीसी समाजाच्या नेत्यांची याबाबत ऑनलाईन बैठक पार पडणार आहे. त्यानंतर या मोर्चाच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.
बावनकुळे साहेब दंडाला स्थगिती म्हणजे माफीच; मेघा इंजिनिअरिंगचा हिशेब मांडत रोहित पवारांचा हल्लाबोल
दरम्यान या ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या ऑनलाईन बैठकीला मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा मोर्चा मुख्यत्वे मराठा समाजाला सरकारने दिलेल्या आरक्षणाच्या जीआरचा विरोध करण्यासाठी आहे. कारण मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याने ते ओबीसी आरक्षणामध्ये येतील. त्यातून ओबीसींच्या आरक्षणामध्ये संख्य वाढल्याने वाटा कमी मिळेल. त्यातून ओबीसीचं नुकसान होणार आहे. त्यामुळे ओबीसींनी हा मोर्चा आयोजित केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…
दरम्यान, नागपुरात येत्या 12 सप्टेंबरला प्रमुख ओबीसी नेत्यांची (OBC Reservation) बैठक होणार आहे. त्यानंतर पहिली लढाई न्यायालयीन स्तरावर लढली जाईल. विदर्भातून वकील संघटना पूर्ण ताकदीने न्यायालयात ओबीसींची बाजू मांडणार आहे. तर दुसरा लढा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाईल, कुणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका असली तरी ओबीसींच्या आरक्षणाला देखील धक्का लागू नये ही पण आमची भूमिका आहे”. असं वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.