NIA on Sachin Vaze’s Bail : अँटिलिया स्फोटक (Antilia Explosive), मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder) प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन वाझेच्या (Sachin Vaze) जामिनाला एनआयएने विरोध केलाय. सचिन वाझेला जामीन दिल्यास पुराव्यात छेडछाड होऊ शकते, असा दावा एनआयएने केलाय. या संदर्भात एनआयएने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलंय. मनसुख हिरेन यांची हत्या करण्याचे काम एकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना देण्यात आलं होतं, असा खळबळजनक दावा एनआयएने आपल्या आरोपपत्रात केलाय.
या प्रकरणात बडतर्फे पोलीस अधिकारी सचिन वाझे हाच मुख्य सूत्रधार आहे, असा दावा एनआयएकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात केलाय. दरम्यान, अँटिलिया प्रकरणानंतर नीता अंबानी आणि मुकेश अंबानी हे भयभीत झाले होते, असा दावा एनआयएच्या प्रतिज्ञापत्रात दावा करण्यात आलाय.
IAS तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली; सत्तारांच्या मंत्रालयातून एका महिन्यात उचलबांगडी
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी जिलेटिनच्या कांड्या असलेली कार आढळली होती. ती कार 18 फेब्रुवारी रोजी मुलुंड-ऐरोली पुलावरुन चोरण्यात आली होती, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, या कारचे मालक हिरेन मनसुख यांचा मृतदेह 5 मार्च रोजी कळवा खाडीत आढळला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ८ मार्च रोजी एनआयएने ताब्यात घेतला.
Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठीशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच
एनआयएने तपासातील माहितीच्या आधारे अँटिलिया विस्फोटके प्रकरणात वाझेला 13 मार्च रोजी अटक केली होती. यापूर्वी ख्वाचा युनुस कोठडी मृत्यू प्रकरणात अटक झाल्यानंतर वाझेला निलंबित केले होते. जवळपास १७ वर्षांच्या निलंबनानंतर त्याला पुन्हा पोलिस सेवेत घेण्यात आले होते.