Mumbai Metro : पाथर्डीच्या कन्येने मोदींना घडवला मेट्रोतून प्रवास

नगर : पाथर्डी तालुक्यातील केळवंडी या खेड्यातील तृप्ती किरण शेटे हिने साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेट्रोची सैर घडवली आहे. मोदींसह मंत्र्यांना मेट्रोतून सैर १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत मेट्रोच्या उद्घाटनासाठी आले होते. मोदींनी ज्या मेट्रोतून प्रवास केला, त्या मेट्रोचे सारथ्य तृप्ती शेटे या तरुणीने केले. याच तरुणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

Untitled Design (4)

Untitled Design (4)

नगर : पाथर्डी तालुक्यातील केळवंडी या खेड्यातील तृप्ती किरण शेटे हिने साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेट्रोची सैर घडवली आहे.

मोदींसह मंत्र्यांना मेट्रोतून सैर

१९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत मेट्रोच्या उद्घाटनासाठी आले होते. मोदींनी ज्या मेट्रोतून प्रवास केला, त्या मेट्रोचे सारथ्य तृप्ती शेटे या तरुणीने केले. याच तरुणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेट्रोतून सैर करवण्याची संधी मिळाली आहे.

चालक होण्यासाठी खडतर परिश्रम

तिला ही संधी सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी तिला गेल्या तीन वर्षांपासून खडतर संघर्ष करावा लागला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत तिने मेट्रो चालक होण्याचे स्वप्न साकार केलं आहे. सध्या मुंबई मेट्रोमध्ये एकूण ९१ मेट्रोचालक असून यापैकी २१ महिला आहेत. त्यातील एक मेट्रोचालक होण्याचा मान तृप्ती शेटेने मिळविला आहे.

Exit mobile version