Download App

PM Modi : ‘उन्होंने गुजरात की तरह दीवार नहीं खड़ी करवाई’, मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून काँग्रेसचा निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi )  हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबई ( Mumbai )  येथे वंदे भारत ट्रेनचे ( Vande Bharat Train )  लोकार्पण केले आहे. त्यांच्या या दौऱ्यावरुन काँग्रेसने ( Congress ) त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीचा एक व्हिडिओ ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे.

या व्हिडिओमध्ये मोदी ज्या रस्त्यावरुन येणार आहेत, त्या रस्त्याच्या एका बाजूला झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्ट्यांना पांढऱ्या कापडाने झाकण्यात आले आहे. यावरुन काँग्रेसने ट्विट करत मोदींना लक्ष केले आहे. शहंशाह मोदी मुंबईत येणार आहेत. त्यांच्या नजरेला गरीब दिसू नये याचा बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे गरीबांना झाकून टाकण्यात आले आहे, असा शब्दात मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

मोदींवर टीका करताना ट्विटमध्ये म्हटले आहे, “बाअदब, बामुलाहिज़ा, होशियार! शहंशाह मोदी मुंबई जा रहे हैं। उनकी नजरों को गरीबी न दिखे इसका इंतजाम कर दिया गया है। हर बार की तरह गरीबों के घरों को ढक दिया गया, ताकि शहंशाह का गरीबी देख मन खराब न हो। शहंशाह इस मर्तबा दरियादिल हैं, उन्होंने गुजरात की तरह दीवार नहीं खड़ी करवाई”, अशी शायरी वापरुन मोदींना लक्ष करण्यात आले आहे.

दरम्यान मोदींनी आज मुंबई येथून दोन वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण केले आहे. मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी अशा दोन रेल्वेंचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यातील मोदींचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

follow us