Download App

PM Modi : ‘मी उद्या मुंबई मध्ये असेल” पंतप्रधान मोदींच मराठीमध्ये ट्विट

  • Written By: Last Updated:

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार असून मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करून आपल्या मुंबई दौऱ्याची माहिती दिली आहे. ट्विट मध्ये म्हटले आहे की “मी उद्या मुंबईत असेन. ३८ हजार कोटी रुपयांचा खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.”

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या ट्विटला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रिट्विट करत मोदी यांचं स्वागत केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मुंबई नगरीत आपले मनःपूर्वक स्वागत आहे. माननीय श्री. नरेंद्र मोदी जी उद्या आपल्या शुभ हस्ते मुंबईतील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार असून या माध्यमातून मुंबईचा नक्कीच कायापालट होणार आहे, हा विश्वास आहे.”

मोदी यांच्या या दौऱ्यासाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी जोरदार तयारी केली आहे. स्वत एकनाथ शिंदे यांनी सभास्थळी जावून पाहणी केली आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा मुंबई महापालिकेचा बिगूल मानला जात आहे.

follow us