कैदीही ऐकणार मोदींची ‘मन की बात’

PM Modi Man Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ मन की बात’ कार्यक्रमाच्या १०० व्या पर्वासाठी ठाणे शहरात भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात ठाणे कारागृहासह सुमारे ४०० हून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्या रविवारी […]

Untitled Design   2023 04 29T195700.585

Untitled Design 2023 04 29T195700.585

PM Modi Man Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ मन की बात’ कार्यक्रमाच्या १०० व्या पर्वासाठी ठाणे शहरात भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात ठाणे कारागृहासह सुमारे ४०० हून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्या रविवारी सकाळी ११ वाजता थेट प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली. विशेष म्हणजे ठाणे कारागृहातील कैदीही मोदींची मन की बात कार्यक्रम ऐकणार आहेत.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यास सुरूवात केली. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे ९९ प्रयोग झाले असून, प्रत्येक प्रयोगानंतर श्रोत्यांची संख्या वाढत गेली. आतापर्यंत भारतातील १०० कोटी नागरिकांनी हा कार्यक्रम टीव्ही वा रेडिओवर ऐकला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांचे पंतप्रधान मोदींबरोबर नाते निर्माण झाले आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

बहीण हरली, भाऊ जिंकला…धनंजय मुंडेंचा परळीत पंकजा ताईंना व्हाईट वॉश!

आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघात सुमारे ४०० हून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे कारागृहातील कैद्यांसमोरही कार्यक्रम सादर केला जाणार असून, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात १०१, ओवळा-माजिवडा मतदारसंघात ९०, कोपरी पाचपाखाडीत ८६, तर मुंब्रा-कळवा मतदारसंघासह शीळ-दिवा परिसरात १०३ ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version