Download App

‘इर्शाळवाडीत काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले’; विधानसभेत CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

Eknath Shinde : राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा जबर फटका बसला आहे. खरिप हंगामावर संकट आले आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या याची माहिती सभागृहात देतानाच इर्शाळवाडीतील घटनेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

आम्ही इर्शाळवाडीत दिखाव्यासाठी गेलो नाही. आमचं सरकार वर्क फ्रॉम होम नाही. आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो. काही लोक व्हॅनिटी व्हॅनमध्ये आल. तर काही लोक चिखल तुडवत गेले. फक्त देखावा करण्यासाठी आम्ही काम करत नाही. माझं सरकार, माझी जबाबदारी एवढ्यापुरती आमची जबाबदारी नाही. आम्ही तोंडाची वाफ दवडत बसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Ram Shinde : ‘मी लढणार, 2024 ला दाखवूनच देणार’; शिंदेंचा पवारांविरुद्धचा प्लॅन ठरला!

आता आमच्या कामाचा वेग वाढला आहे. त्यामुळे काही जणांना पोटदुखी होत आहे. आम्ही जे निर्णय घेतले आहेत, ते लोकांच्या भल्यासाठी घेतले आहेत. आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत, रस्ते तुडवित पाहणीला जातो. महाविकास आघाडीचं सरकार असताना फडणवीसांची कामे स्थगित केली होती. आमचं सरकार आल्यावर लगेत ती कामे सुरू करण्यात आली, असे शिंदे म्हणाले.

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत

सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार , टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर, 2023 या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येईल. विधानसभेत केलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी वाढीव मदतीबाबत माहिती दिली.

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत; वाचा कुणाला किती रक्कम मिळणार

 

Tags

follow us