मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि समाजसुधारक महात्मा फुलेयांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive Statement) केल्याप्रकरणी भाजपाचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरोधातील समाजामाध्यमांवर टिपण्णी कऱणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ता संदीप कुदळे विरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police) दाखल केलेला गुन्हा बेकायदा असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाचा ( bombay hc ) दिला. तसेच अवैधरित्या अटकेची कारवाई केल्याबद्दल हायकोर्टाने राज्य सरकारला लावला २५ हजारांचा दंठ ठोठावला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल कुदळे यांच्यावर २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. एकाच गुन्ह्यासाठी दोन गुन्ह्यांची गरजच काय? असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला आणि पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशांना नाकारायला शिका. तसे करणे शक्य नसल्यास त्या आदेशांची लेखी मागणी करा, असे महत्त्वपूर्ण निरिक्षण कोर्टाने आदेशात नमूद केले आणि संदीपविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द केला.
चंद्रकांत पाटील यांच्या आक्षेपार्ह विधानावर संदीप कुदळेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. याविषयी पुणे पोलिसांनी संदीपविरोधात गुन्हा दाखल केला तो गुन्हा रद्द करण्यासाठी संदीपने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या सुनावणीनंतर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने 18 जानेवारी रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.
पोलिसांना त्यांच्या पातळीवर काम करताना प्रचंड दडपण आणि ताण असतो. एखाद्यावेळी त्यांना तातडीने गुन्हा दाखल करावासा वाटला तर त्यात त्यांची चूक नाही. मात्र तरीही पोलीसांनी गुन्हा दाखल करताना काळजी घ्यावी, यात सर्वसामान्यांचा पैसा आणि वेळ वाया जातो, याचें भान राखायला हवं. एका प्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करता येत नाहीत, कायद्याने त्यापैकी एकच गुन्हा दखलपात्र राहतो हो गोष्टी पोलीसांनी लक्षात का राहत नाही?, असा सवालही खंडपीठाने सुनावणीवेळी उपस्थित केला.
https://letsupp.com/mumbai/holding-hand-of-girl-without-any-sexual-intent-not-sexual-harassment-bombay-high-court-18626.html
काय आहे प्रकरण
महात्मा फुले आणि आंबेडकरांवरील विवादित वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संदीप कुदळेने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात रात्री १२ वाजता त्यांच्या कोथरुडमधील बंगल्याबाहेर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. संदीप कुदळेला पोलिसांनी अटक करत समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला होता.