नाशिक आयजी म्हणून नियुक्ती झालेले प्रवीण पडवळ यांची पुन्हा बदली, आता संजय येनपुरे यांच्यावर जबाबदारी

IPS Officer transfer-गेल्या आठवड्यात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Pravin Padval

Pravin Padval

IPS Officer transfer: राज्यातील पोलिस प्रशासनात मोठा फेरबदल होत आहे. गेल्या आठवड्यात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी प्रशिक्षण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पडवळ (Pravin Padwal) यांची नियुक्ती झाली होती. परंतु आता त्यांची बदली झाली आहे. ते व्हीआयपी सुरक्षा विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. तर व्हीआयपी सुरक्षाला असलेले संजय येनपुरे ( Sanjay Yenpure) हे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असणार आहेत.

शारदा राऊत यांची महिला अत्याचार प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची नियोजन व समन्वयचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर संदीप पाटील यांची अमरावती परिक्षेत्रातून नागपूरला विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे पंजाबराव उगले यहे आता ठाणे शहराचे पोलिससह आयुक्त असणार आहेत. तर महेश पाटील हे आता अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असणार आहेत.


बदल्या झालेले अधिकारी-

शीला साईल मुंबईत शहरात उपआयुक्त बाळासाहेब पाटील-मुंबई शहरातून ठाणे शहर उपआयुक्त, एस. एस. बुरसे-ठाणे शहरातून उपआयुक्त-राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई, श्रीकांत परोपकारी-ठाणे शहरातून उपआयुक्त सागरी सुरक्षा राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई), रविंद्र परदेशी-राज्य गुप्तवार्ता विभागातून पुणे राज्य राखीव पोलिस बल गट समादेशक असणार आहे.


प्रकाश जाधव संभाजीनगरचे एसपी

प्रकाश जाधव यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर संभाजीनगर ग्रामीणचे एसपी विनय राठोड हे ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक असणार आहेत. तर धीरकुमार बच्चु यांची कोल्हापूरमधील ठाणे शहर पोलिस उपआयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर विमला एम. यांची राज्य राखीव पोलीस बल अहिल्यानगर येथून अप्पर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण बदली झाली आहे.


राज्य पोलिस सेवेतील या अधिकाऱ्यांच्या बदल्या

याचबरोबर आणखी अठरा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. ठाणे शहरचे उपआयुक्त शशिकांत बोराटे यांची राज्य पोलिस नियंत्रण कक्षाचे अधीक्षक म्हणून, तर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुण्याचे संभाजी कदम यांची दहशतवाद विरोधी पथक (पुणे) पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर अकबर पठाण यांची मुंबई शहर, विवेक पाटील यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) पोलिस अधीक्षक, विवेक पानसरे यांची ठाणे शहर पोलिस उपआयुक्त, अमरसिंह जाधव यांची डायल-112 नवी मुंबई पोलीस अधीक्षक, संजय सरगौंडा पाटील यांची मिरा भाईंदरला पोलिस उपआयुक्त. तर पीएमआरडीएचे पोलिस अधीक्षक यांची मिरा भाईंदरला उपआयुक्त म्हणून. तर शिवाजी पवार यांची पिंपरी चिंचवडला पोलिस उपाआयुक्त म्हणून, प्रिती टिपरे यांची अन्न व औषध प्रशासन (मुंबई) सहआयुक्त, समीर शेख याची बीडचे अपर पोलीस अधीश्रक, हिंमत जाधव यांची अप्पर पोलिस अधीक्षक अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स पुणे, रमेश चोपडे यांची नानवीज दौंड पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे बदली झाली आहे. दत्तात्रय कांबळे यांची मुंबई शहर पोलिस उपआयुक्त, निलेश सोनावणे यांची ठाणे शहर पोलिस उपआयुक्त, तर तानाजी चिखले यांची अप्पर पोलिस अधीक्षक परभणी येथे बदली झाली आहे.

Exit mobile version