IPS Officer Transfer : आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूर ग्रामीणला नवे पोलिस अधीक्षक

IPS Officer Transfer : आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूर ग्रामीणला नवे पोलिस अधीक्षक

Maharashtra IPS Transfer : राज्यात 17 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलीयं.

भाऊबीज परत घेतली जात नाही; सावत्र भावाची उपमा देत फडणवीसांचं विरोधकांना उत्तर

बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची यादी :
अतुल कुलकर्णी – पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
शिरीष सरदेशपांडे – पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे
श्रीकृष्ण कोकाटे – पोलीस अधीक्षक, हिंगोली
सुधाकर बी. पठारे – पोलीस अधीक्षक, सातारा
अनुराग जैन – पोलीस अधीक्षक, वर्धा
विश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा
संजय वाय. जाधव – पोलीस अधीक्षक, धाराशीव
कुमार चिता – पोलीस अधीक्षक, यवतमाळ
आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.१, पुणे
नंदकुमार ठाकूर – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, दौंड
निलेश तांबे – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
पवन बनसोड – पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती
नुरुल हसन – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.11, नवी मुंबई
समीर अस्लम शेख – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
अमोल तांबे – पोलीस अधीक्षक/दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे
मनिष कलवानिया – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
अपर्णा गिते – कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई

Taal movie: सुपरहिट ‘ताल’ चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण; अभिनेता अनिल कपूरकडून आठवणींना उजाळा

शासन आदेश, गृह विभाग, क्र. आयपीएस-२०२४/प्र.क्र.८८/पोल-१, दिनांक ०७.०८.२०२४ द्वारे, श्रीम. प्रियंका नारनवरे, भा.पो.से., समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. ४, नागपूर यांची “पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर” या पदावर बदलीने करण्यात आलेली पदस्थापना, याद्वारे, रद्द करण्यात येत आहे. त्या अनुसार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांनी कायदा व सुव्यवस्था, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, इत्यादी लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही करावी.

हा शासन आदेश, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न (२) मधील परंतुकानुसार, सर्वोच्च सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या