Download App

Pravin Darekar : होळीच्या निमित्ताने शिवसेना संपवायचे विचार त्यांच्या मनातून जावेत

  • Written By: Last Updated:

मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजप आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी खास होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘संजय राऊतांच्या विकृत मानसिकतेतून येणारी वक्तव्य होळीमध्ये जळून जावीत. नव्या दमाने त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करावं अशा माझ्याकडून त्यांना होळीच्या शुभेच्छा आहेत,’ असे प्रविण दरेकर म्हणाले.

आणखी शुभेच्छा देताना प्रविण दरेकर, ‘शिवसेना घालवली, धनुष्यबाण घालवला आणि शिवसेनेचं नाव पण घालवलं. बाळासाहेबांचा विचार तर अगोदरच घालवला आहे. उरलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील त्यांना संपवायची असेल तर होळीच्या निमित्ताने त्यांचे हे विचार जावेत,’ अशा शुभेच्छा प्रविण दरेकर यांनी दिल्या आहेत.

Ashish Shelar : …म्हणून लता दिदींच्या संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली, उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

पुढं दरेकर म्हणाले, रोज सोईप्रमाणे कधी सरकारवर, कधी न्यायालयावर, कधी निवडणूक आयोगाबद्दल संजय राऊत टोकाचं वक्तव्य करीत आहेत. काही ठिकाणी शिव्या देखील देत आहेत. ह्या सर्व प्रकरणाची सरकारने गांभिर्याने दखल घेण्याची गरज आहे.

संजय राऊत भ्रमिष्ट झाले आहेत. वादग्रस्त बोलण्याचे अॅडिक्ट झाले आहेत. शिव्या दिल्या किंवा वादग्रस्त बोललं की त्यांना वाटतं प्रसिद्ध मिळते. जसे आपण नॅशनल हिरो होतोय. हा जो आविर्भाव त्यांच्या मनात यायला लागला आहे. त्यामुळे अशा गोष्टी करायला ते प्रवृत्त होतात. या सर्व प्रकरणाची राज्य सरकारने दखल घ्यायला पाहिजे. त्यांची शिव्या देण्याची सवय थांबवली पाहिजे, अशी टीका भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

Tags

follow us