Download App

पंतप्रधान मोदी आज Vande Bharat Train ला देणार ग्रीन सिग्नल

  • Written By: Last Updated:

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईला दोन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train ) गाड्या भेट देणार आहेत. यात्रेकरूंसाठी या गाड्या वरदान ठरणार आहेत कारण एक वंदे भारत गाडी मुंबई ते साई धाम शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर धावणार आहे. पंतप्रधान आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-18 वरून दोन्ही हायस्पीड ट्रेनला ग्रीन सिग्नल देतील.

वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पीएम मोदी आज सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचे ऑनलाइन उद्घाटनही करतील. यानंतर ते शिवाजी महाराज टर्मिनस येथून आयएनएस शिक्राला जातील. येथून हेलिकॉप्टरने मुंबई विमानतळावर पोहचतील. त्यानंतर 4.30 वाजता अल्जामिया-तुस-सैफिया (सैफ अकादमी) च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करतील आणि त्यानंतर संध्याकाळी ते दिल्लीला रवाना होतील.

मोदी आज मुंबईत ज्या दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत त्याचा यात्रेकरूंना खूप फायदा होणार आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन ही देशातील 9वी वंदे भारत ट्रेन असेल. नवीन ट्रेनमुळे मुंबई आणि सोलापूर यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि सोलापूरमधील सिद्धेश्वर, सोलापूरजवळील अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा प्रवास सुकर होईल.

मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन ही देशातील 10वी वंदे भारत ट्रेन असेल. ही गाडी महाराष्ट्रातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी, शनी शिंगणापूर या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जाणार आहे. तर, मुंबई ते सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सिद्धेश्वर, सोलापूरजवळील अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना उत्तम प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहेत.

पीएम मोदींनी 19 जानेवारी रोजी मुंबईला भेट दिली होती आणि मेट्रो 2A आणि 7 देशाला समर्पित केले आणि अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण केले. शुक्रवारी, ते उत्तर प्रदेशातून सुध्दा हेलिकॉप्टरने कुलाब्यातील आयएनएस शिक्रा या नौदल हेलिबेसवर जातील आणि त्यानंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर, ते विमानतळावर परत जातील आणि मरोळ कार्यक्रमासाठी रस्त्याने प्रवास करतील, तेथून ते दिल्लीला परत जातील.

Tags

follow us