Pune Politcs : काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यातील कोल्हापूर, अंधेरी (मुंबई) या पोटनिवडणुकीत भाजपने आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी पुणे शहर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे, असे सांगत प्रदेश काँग्रेसच्या आदेशाची आम्ही वाट पाहत असल्याचे शहराध्यक्ष आरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. तसेच कसब्यातून जो निवडून येईल तो इतिहास घडवेल, असा विश्नास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे (Muktya Tilak) नुकतेच निधन झाल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली. येत्या 27 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक होणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नुकताच घोषित केला आहे. दोन्हीही मतदारसंघातील आमदारांचे दीर्घ आजारपणामुळे निधन झाले आहे.
आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने उडी घेतली आहे. या मतदारसंघातील मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरविंद शिंदे हे अवघ्या 20 ते 25 हजार मतांनी ते पराभूत झाले होते. त्यामुळे या निवडणुकीसाठी शहर काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी सुरु केली आहे. आता प्रदेश काँग्रेसच्या आदेशाची वाट पाहत आहे.
आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या मतदारसंघांमध्ये तत्काळ प्रभावाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.