Download App

मोठी बातमी ! राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची गळाभेट घेत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले.

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray at Matoshree : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे मातोश्रीवर दाखल झालेत. दोघांमध्ये कटुता निर्माण झाल्यानंतर राज ठाकरे हे तब्बल वीस वर्षे मातोश्रीवर गेले नव्हते.आज ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. दोघांमध्ये तब्बल वीस मिनिटे चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

मराठीच्या मुद्द्यावरून दोघेही एकत्र आले होते. त्यांनी 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करून जोरदार भाषणे केली होती. त्यावर दोघांची राजकीय कटुता मिटल्याचे दिसून येत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे व राज ठाकरे दोघांचे कुटुंबही एकत्र दिसले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले. दोघांची गळाभेट झाली. राज ठाकरे यांनी मोठे बंधू उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत.

ठाकरे-शिंदे सेना एकत्र येणार? ‘संधी पाहून राजकारण महाराष्ट्रात नवं नाही….’ नक्की काय म्हणाले संजय शिरसाठ


मला खूप आनंद झाला-उद्धव ठाकरे

राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या मातोश्रीवर हजर राहून शुभेच्छा दिल्यानंतर त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. ते म्हणाले, राज यांनी मला मातोश्रीवर येऊन शुभेच्छा दिल्यात. त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे.


सप्टेंबरमध्ये दिल्लीत मोठा स्फोट! संजय राऊतांचा खळबळजनक दावा, दहा वर्षांत न घडलेलं आता घडणार…

नातेसंबंध सुधारले पण राजकीय युती कधी जाहीर करणार ?
राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे महिन्याभरात दोन वेळेस एकत्र भेटले आहेत. दोघांमध्ये निर्माण झालेली कटुता दूर झालेली दिसून येत आहे. दोन भाऊ म्हणून दोघांचे नातेसंबंधही सुधारल्याचे आजच्या मातोश्रीवरील भेटीवरून दिसून येत आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विशेषत मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना (उबाठा) व मनसे दोन पक्षांची राजकीय युती होण्याची शक्यता आहे. परंतु दोघांकडून अद्याप कुठलेही अधिकृत घोषणा दोघांकडून झालेली नाही. दोघांच्या होणाऱ्या भेटीगाठी, राज ठाकरे यांनी थेट वीस वर्षानंतर मातोश्रीवर जाणे हे दोघांची राजकीय युतीसाठी हे पूरक आहेत. त्यामुळे कधी दोघेही युती झाल्याचे घोषित करू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

follow us