ठाकरे-शिंदे सेना एकत्र येणार? ‘संधी पाहून राजकारण महाराष्ट्रात नवं नाही….’ नक्की काय म्हणाले संजय शिरसाठ

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray: सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना एकत्र येणार का ? या प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केलाय. दोन्ही शिवसेना (Shivsena) एकत्र आल्या पाहिजेत या अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, ‘दानवेंनी हे उद्धव ठाकरेंना जाऊन सांगावं’. ‘आपण कार्यकर्ते आहोत, ते राजा लोक आहेत. सैनिकाच्या जाण्याने राजाला काय फरक पडतो’, असा खोचक टोलाही संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
हरिद्वार हादरलं! मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा 6 वर
शिंदेंना तुम्ही ठाकरेंसोबत एकत्र येण्याविषयी सांगणार का ? या प्रश्नावर संजय शिरसाठ म्हणाले की,‘नाही, आम्ही का जाऊन सांगावं? आम्ही फुटायच्या मनस्थितीत नव्हतोच. पण आम्हाला अनुभव आहे की, ते ऐकणार नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केले. ठाकरेंच्या आजुबाजूला चुकीचे माणसे असल्याने ही अवस्था झाली असल्याचे शिरसाट म्हणाले.आजूबाजूच्या लोकांनी पक्ष विकला.अनेक दिग्गज लाइनमध्ये असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिकीट दिलं होतं. ते म्हणाले की, संजयच उमेदवार राहिल, असा आमचा नेता होता. पण आता प्रश्न आहे की नेमकं पक्षप्रमुख कोण आहे. त्यांच्या आमदारांची काय अवस्था आहे हेही जाऊन विचारा’.
पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची छापेमारी; एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक
दोन्ही शिवसेना एकत्र येणार?
दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, या प्रश्नावर संजय शिरसाठ म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का ? यावर आज भाष्य करणं योग्य होणार नाही. दरी खूप वाढली आहे’. पुढे शिरसाट म्हणाले की, ‘संधी पाहून राजकारण हे महाराष्ट्रत आत्ताच होत नाही, महाराष्ट्राची ही परंपरा आहे. प्रत्येक पक्षातील लोक इकडे तिकडे आले आहेत. उद्या आमचं काय होईल हे शिंदे साहेब ज्यावेळी निर्णय घेतील, त्यावर अवलंबून असल्याचे शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या सेनेतील लोकांबरोबर, जुन्या सहकाऱ्यांसोबत परत कनेक्ट झालात का ? या प्रश्नावर संजय शिरसाठ म्हणाले की, ‘ते राजा लोकं आहेत, आपण कार्यकर्ते आहोत. राजाच्या सैन्यातला एखादा सैनिक बाजूला गेला तरी राजाला काय फरक पडतो. उद्धव ठाकरे म्हणतात सुद्धा तसं की, ज्याला राहायचं त्याने राहा, ज्याला जायचं त्यांनी जा. आपण सैनिकाच्या भूमिकेत होतो. त्यामुळे आपल्यामुळं त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. ते मोठे लोकं आहेत. त्यामुळं आपण ही अपेक्षाच करू नये की आपल्याला ते बोलावतील’.