मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी पुन्हा एकदा त्यांचे मराठी कार्ड बाहेर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे नेहमी त्यांच्या भाषणाची सुरूवात जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींने अशी करतात. परंतु, आज त्यांनी जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो-भगिनींने आणि मातांनो अशी केली. ते पनवेलमध्ये आयोजित मनसेच्या निर्धार मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. यावेळी भाजपने इतरांचे पक्ष न फोडता स्वतःचा पक्ष उभारावा. दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा स्वतःचा पक्ष उभारायला भाजपनं शिकावं असा घणाघात केला. तसेच त्यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
Sharad Ponkshe यांची राहुल गांधींवर तिखट शब्दात टीका; म्हणाला,”तू तर फिरोज खान…”
आगामी काळात राज्यात महानगरपालिकांसह लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याआधी अनेक राजकीय पक्षांनी मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक स्तरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरूवात करण्यास सुरूवात केली आहे.
पण, राज ठाकरेंनी पनवेल येथील निर्धार मेळाव्यात मराठी माणूस आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींवर भाष्य केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे नेहमी त्यांच्या भाषणाची सुरूवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो अशी करतात. त्यांची ही सुरूवात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून असल्याचे बोलले जाते.
‘मलाही चेकमेट करण्याचा डाव पण, आम्ही राजकारणातले ग्रँडमास्टर’; CM शिंदेंची विरोधकांवर तिरकी चाल
मध्यंतरीच्या काळात ज्यावेळी मनसेचा झेंडा बदलण्यात आला. तेव्हापासून राज ठाकरे त्यांच्या भाषणातची सुरूवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो अशी करत होते. पण आज त्यांनी या गोष्टीला बगल देत भाषणाची सुरूवात जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो-भगिनींने आणि मातांनो अशी केली. त्यामुळे राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाची कूस बदल निवडणुकांपूर्वी मराठी कार्ड बाहेर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
परराज्यातील नागरिकांचा मुद्दा गाजवला
मध्यंतरीच्या काळात राज ठाकरेंनी मुंबईसह राज्यभर परज्यातून येणाऱ्या नागरिकांबाबत राज ठाकरेंनी हत्यार उपसलं होतं. याशिवाय मराठी मुलांच्या नोकऱ्यांबाबतच्या प्रश्नावरदेखील तोडगा काढण्याचा मुद्दा हाती घेतला होता. त्यांच्या या दोन्ही मुद्द्यांवर राज यांनी लाखो मतदारांना स्वतःकडे आकर्षित करण्यात बऱ्यापैकी यश मिळवले होते. याचा फायदादेखील काहीप्रमाणात राज यांना झाला होता. अमराठी भाषिकांच्या मुद्द्यावर त्यांना करोडो नागरिकांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे हा मुद्दा अनेक दिवस राज्यभर मोठ्या प्रमाणात गाजला होता.
मराठी कार्डाचा फायदा होणार?
त्यानंतर आज (दि. 16) पुन्हा राज यांनी पनवेलच्या कार्यक्रमात भाषणाची सुरूवात नेहमीच्या पद्धतीने न करता जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो-भगिनींने आणि मातांनो अशी केली आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी कार्ड बाहेर काढले आहे का? आणि त्याचा फायदा पक्षाला आणि राज ठाकरेंना होतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.