Sharad Ponkshe यांची राहुल गांधींवर तिखट शब्दात टीका; म्हणाला,”तू तर फिरोज खान…”

Sharad Ponkshe यांची राहुल गांधींवर तिखट शब्दात टीका; म्हणाला,”तू तर फिरोज खान…”

Sharad Ponkshe On Rahul Gandhi: मराठी अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत सडेतोड टीका केली आहे. (Social media) राहुल गांधी यांचे मूळ आडनाव गांधी नाही तर खान आहे, ते फिरोज खान यांची औलाद आहे, अशी सडेतोड टीका त्यांनी यावेळी केली आहे. त्यांच्या या टीकेचे आता तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक येथील मालेगाव येथे बुधवारी भारतीय विचार मंचातर्फे प्रबोधन आणि जनजागृतीसाठी वीर सावरकरांवर आधारित व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली होती.

शरद पोंक्षे म्हणाले आहेत की, एक तर तू गांधी नाही आणि सावरकर देखील नाही. हे ओरिजनल गांधी नसून, ते खान आहेत. ते महात्मा गांधींचे वंशज नसल्यचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांच्या आडनावाचा फायदा घेत आहेत. ही फिरोज खान यांची पुढची पिलावळ आहे, हा त्यांचा इतिहास आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

Box Collection: ‘गदर २’ची पाचव्या दिवशी घोडदौड सुरुच; लवकरच मोडणार ‘द केरला स्टोरी’चा रेकॉर्ड!

तसेच या मूर्ख लोकांना त्यांचाच आजीचा इतिहास माहिती नाही, तर त्यांना सावरकरांचा काय इतिहास माहितीय? असा प्रश्न देखील पोंक्षे यांनी यावेळी केला आहे. राफेल प्रकरणामध्ये त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये देखील माफी मागावी लागली होती. अपिल करण्याची संधी जोपर्यंत होती तेव्हा ते कोर्टामध्ये  माफी मागत होते. सावरकर प्रकरणामध्ये देखील असेच घडले आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

अभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक त्यांचे चांगलेच वादग्रस्त असल्याचे बघायला मिळाले होते. त्यांच्या हे नाटकाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. यामुळे या नाटकाचे प्रयोग देखील बंद पाडण्यात आले होते. परंतु आता हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर सादर करण्याचा निर्णय पोंक्षे यांनी हाती घेतला आहे. पोंक्षे यांनी स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल महत्वाची घोषणा केल्याचे देखील बघायला मिळाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube