Ramdas Athavle Adopted a leopard named Simba : सेलिब्रेटींसह राजकीय नेत्यांच प्राणीप्रेम अनेकदा पाहायला मिळत असंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रिय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle ) यांचे देखील प्राणीप्रेम समोर आलं आहे. त्यांनी नुकतच एक सिंबा नावाचा बिबट्या (leopard) दत्तक (Adopted) घेतला आहे. याबद्दल सांगताना आठवले म्हणाले की, मी दलिज पॅंथर या चळवळीतून आलेलो आहे. त्यामुळे त्याच्याशी वेगळ नात आहे. म्हणून मी हा पॅंथर म्हणजे बिबट्या दत्तक घेतला आहे.
NEET पेपरफुटी झालीच नाही; केंद्राचा मोठा दावा, सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी
आठवले म्हणाले की, राजीव गांधी नॅशनल पार्क हा अत्यंत मोठा आहे. तर गेल्या सहा वर्षांपासून माझा मुलाच्या नावाने बिबट्या दत्तक घेतला आहे. प्रत्येक वर्षी त्याच्यासाठी एक लाख 25 हजार रुपये आमच्याकडून त्यांना देण्यात येतात. प्राण्यांचे संरक्षणासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. तसेच मी दलित पॅंथर या चळवळीतून आलेलो आहे.
राज्यात पुन्हा आमदारांची फोडाफोडी? शिंदे-ठाकरेंसह सर्वांचे आमदार 5 स्टार हॉटेलात रवाना
त्यामुळे पॅंथर हा प्राणी कोणावरही अन्याय करत नाही. मात्र त्याच्यावर कोणी अन्याय केला तर तो त्याचा प्रतिकार करतो. त्यामुळे त्याच्याबद्दल नेहमीच आकर्षण असल्याने हा बिबट्या आम्ही दत्तक घेतला आहे. तसेच त्याची पाहणी करण्यासाठी मी दरवर्षी या ठिकाणी भेट देतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त मी ही भेट देत असतो. अधिकाऱ्यांशी संवाद साधतो त्यांच्या काही अडचणी असतील त्या समजून घेतो. असं म्हणत रामदास आठवले यांनी आपल्या या प्राणीप्रेमाबद्दल माहिती दिली आहे.