Download App

Refinery Survey विरोधी आंदोलनात आणखी एकाला अटक, निषेधार्थ विविध संघटना मैदानात

Refinery Survey In Kokan : कोकणातील एक महत्त्वाचा आणि नागरिकांचा प्रचंड विरोध होत असलेला प्रकल्प म्हणजे रिफायनरी. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध असतानाही आता या प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून हे सर्वेक्षण सुरू होताच नागरिकांनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.

यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत तीन जाणांना अटक देखील केली आहे. मात्र या अटकेविरोधात आता विविध संघटना मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी एका पत्राद्वारे या अटकेचा निषेध करत या आंदोलकांना तात्काळ सोडण्याची मागणी केली आहे. या पत्रामध्ये म्हटले आहे की, बारसू सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामसभेंच्या रिफायनरी विरोधी ठराव असूनही ग्रामस्थांना विश्वासात न घेता जमीन सर्वेक्षण करण्यास सरकार प्रचंड पोलीस बळाचा वापर करत आहे.

या सर्वेक्षणाला सोमवारपासून सुरुवात झाली. सर्वेक्षणापूर्वीच कोणतेही कारण न सांगता सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना कोणतेही करण न सांगता शनिवारी अटक करण्यात आली. रविवारी रात्रीपर्यंत तरी त्यांच्यावर कोणती कलमे लावली आहेत हे देखील कळले नाही. म्हणजेच त्यांना पोलिसांनी बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवले आहे असे म्हणावे लागेल. रविवारी रात्री सुमारे 10.30 वाजता त्यांना आजपर्यंत कोणतेही गुन्हे नसताना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेले आहे.

किसान सभेचे पुन्हा राज्यव्यापी आंदोलन, महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ

ग्रामस्थांचा विरोध आणि ग्रामसभेचे रिफायनरी विरोध असूनही प्रचंड दडपशाही आणि पोलीस बळाचा वापर करून सर्व्हेक्षण करण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची अटक करून, संघटनेमधील इतर कार्यकर्त्यांना तडीपारीच्या, जिल्हाबंदीच्या नोटीसा बजावून ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवण्याच्या हा प्रकार आहे. आम्ही या पत्राद्वारे अशी मागणी करतो की, सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांची तात्काळ सुटका करावी व जबरदस्ती चाललेले जमीन सर्वेक्षण रद्द करावे.

दरम्यान आता यामध्ये आणखी एक जणाला अटक करण्यात आली आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना देखील सोमवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या दोन सहकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिघांनाही रत्नागिरीत ठेवण्यात आले आहे.

Tags

follow us