Download App

‘बॅंक बंद करा, अन्यथा…’ ‘लश्कर–ए–तैयब’ चा अधिकारी बोलतोय; RBI ला धमकीचा फोन

  • Written By: Last Updated:

Reserve Bank Of India Received Threat Call : राज्यात निवडणुकीच्या धामधुमीत एक मोठी बातमी समोर आलीय. रिझर्व बँक ऑफ इंडियाला (Reserve Bank Of India) एक धमकीचा फोन आलाय. हा फोन (Threat Call) रिझर्व बँकेच्या ग्राहक महत क्रमांकावर आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने ‘लश्कर – ए – तैयब’चा विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचा दावा केला. हा फोन शनिवार 16 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने लश्कर-ए-तैयबचा (Lashkar E Taiba) सीईओ असल्याचा दावा केलाय.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटलंय की, बँक बंद करा. मोटरगाडी धडक देणार असल्याची धमकी देखील दिलीय. फोन आल्यानंतर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेवून माता रामाबाई मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. तसंच तपासाला देखील सुरूवात करण्यात आलीय. हा एक खोडसाळपणा असू शकतो, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

“मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा…” मनोज जरांगे यांची भावनिक साद, म्हणाले ‘माझ्या समाजाचा लढा…’

विमान कंपन्या, शाळा यानंतर आता थेट रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला धमकीचा फोन आलाय. पोलीस या घटनेची गांभीर्याने दखल घेत आहेत. हा फोन नेमका कुठून आलाय, कोणी केलाय याचा शोध घेतला जातोय. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मागचा रस्ता बंद करा. इलेक्ट्रिक कार बंद झालीय, असं म्हणत फोन ठेवलाय. आरबीआयला हा धमकीचा फोन आल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांत तक्रार दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

डोंबिवलीकरांची साथ.. पुन्हा विजयाचा निर्धार; रवींद्र चव्हाणांना पक्का विश्वास

मागील काही महिन्यांपासून असे धमकीचे फोन येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा प्रकारचे फोन इंडियन एअरलाईन्सला देखील येत होते. त्यामुळे उड्डाण घेतलेल्या अनेक विमानांचं अचानक लॅंडिंग देखील करण्यात आलंय. या धमक्यांमुळे विमान कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलंय. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा कसून तपास करत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचं सायबर विंग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. या धमकीच्या फोनमुळे प्रवाशांमध्ये देखील मोठं गोंधळाचं वातावरण आहे. सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.

 

follow us