डोंबिवलीकरांची साथ.. पुन्हा विजयाचा निर्धार; रवींद्र चव्हाणांना पक्का विश्वास

डोंबिवलीकरांची साथ.. पुन्हा विजयाचा निर्धार; रवींद्र चव्हाणांना पक्का विश्वास

Ravindra Chavan : राज्यात निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. आता प्रचाराचे शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचारात चांगलाच रंग भरला आहे. डोंबिवली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाणही मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. चौक सभा, रोड शो, प्रचार रॅलींच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या प्रचार सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक सामाजिक संस्थांकडून मतदानाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. डोंबिवली पूर्व येथील ब्राह्मण सभागृहामध्ये सेनापती बापट मित्र मंडळाच्यावतीने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमासाठी रवींद्र चव्हाण उपस्थित होते. त्यांनी येथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या २० तारखेला आपल्यापैकी प्रत्येकाने हे कर्तव्य बजावलेच पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यकर्ता भाजपाची खरी शक्ती, राज्यात पुन्हा महायुती सरकार, मंत्री रवींद्र चव्हाणांना विश्वास

डोंबिवली पूर्व येथील गरीबाचा वाडा उत्कर्ष समितीने काल आयोजित केलेल्या सभेला रवींद्र चव्हाण उपस्थित होते. डोंबिवलीकरांचं प्रेम, आशीर्वाद आणि साथ नेहमीच बळ देतं. यावेळी परिसरातील विविध सोसायट्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-महायुतीला आपला जाहीर पाठींबा दिला. तसेच सर्वांनी पुन्हा एकदा डोंबिवलीत कमळ फुलवून महायुतीला विजयी करण्याचा संकल्प केला.

डोंबिवलीत पुन्हा विजयी होणारच..

डोंबिवली शहर आणि भाजप-महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच आहे. त्यामुळेच प्रचारासाठी भाजप-महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते डोंबिवलीत फिरत असताना प्रत्येक ठिकाणी डोंबिवलीकर प्रेमाचा आणि आपुलकीचा वर्षाव करत आहेत. डोंबिवली पूर्व परिसरातील महावीर हाईट्स, शेलार चौक, म्हसोबा चौक, चोळेगाव या भागात रवींद्र चव्हाण यांनी चौक सभा घेतल्या.

या सभांना मिळणारा डोंबिवलीकरांचा प्रतिसाद हेच सांगतो आहे की डोंबिवलीत पुन्हा एकदा भाजप-महायुतीचे कमळच फुलणार असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. या चौक सभांमध्ये भाजप कल्याण लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुनिल फलदेसाई, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव मिहिर देसाई, मंडल सरचिटणीस मितेश पेणकर, शिवसैनिक रश्मीताई गव्हाणे, युवासेनेचे राहुल म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्ष पूनम पाटील, शिवाजी आव्हाड आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. माजी नगरसेवक साई शेलार, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रमिला चौधरी, चिंतामणी पाटील, राजू शेख, रवि सिंह ठाकूर यांच्यासह भाजप-महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तळोजा मेट्रो प्रकल्प डोंबिवलीकरांसाठी फायदेशीर ठरणार, मंत्री रवींद्र चव्हाणांना विश्वास

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube