तळोजा मेट्रो प्रकल्प डोंबिवलीकरांसाठी फायदेशीर ठरणार, मंत्री रवींद्र चव्हाणांना विश्वास

  • Written By: Published:
तळोजा मेट्रो प्रकल्प डोंबिवलीकरांसाठी फायदेशीर ठरणार, मंत्री रवींद्र चव्हाणांना विश्वास

Ravindra Chavan : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महायुतीकडून (Mahayuti) पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत आहे. भाजप (BJP) नेते आणि राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आज डहाणू तालुक्यातील जामशेत जिल्हा परिषद गटाच्या भाजप-महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर संवाद साधला. तर दुसरीकडे या बैठकीमध्ये डहाणू विधानसभा मतदारसंघात (Dahanu Assembly Constituency) भाजप-महायुतीचे कमळ फुलवायचेच, असा निर्धार यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीला भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, डहाणू विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद मेढा यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीमध्ये बोलताना, रवींद्र चव्हाण यांनी  डहाणू-पालघरमध्ये महायुतीचे उमेदवारच विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच राज्यात महायुतीची सरकार पुन्हा एकदा येणार आणि यावेळी महायुती 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली ते तळोजा मेट्रो प्रकल्प हा डोंबिवली आणि सभोवतालच्या परिसरातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा प्रकल्प आहे. या मेट्रो लाईनमुळे कल्याण, डोंबिवली, शिळफाटा, आणि तळोजा या भागांना एकमेकांशी जोडले जाणार असल्याने या भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे.

Video : विधेयक फाडले अन् संसेदत करू लागली Haka डान्स, महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पामुळे (Taloja Metro Project) या परिसरातील विकासाला गती मिळणार असून, परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिकांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. असं माध्यमांशी बोलताना भाजप नेते आणि राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube