Road Accident : मुंबई शहरातील वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल प्लाझा परिसरात भीषण अपघात (Road Accident) झाला. ही दुर्घटना गुरुवारी रात्री घडली. भरधाव वेगातील कारने तब्बल सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जखमी झालेल्यांमध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातानंतर येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताचा एक व्हिडिओही आता समोर आला आहे.
Sushma Andhare : ‘मराठा-ओबीसी वादाचा भाजपाचा डाव’ सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
जखमींमध्ये इनोव्हा कारच्या चालकाचाही समावेश आहे. अपघातानंतर वांद्रे वरळी सी लिंकवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत मदतकार्य सुरू केले. या रोडवर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. आताचा अपघाती सी लिंकवरील टोल प्लाझाच्या अवघ्या शंभर मीटर आधी झाला. एका इनोव्हा कारने मर्सिडीज कारला धडक दिली. त्यानंतर पळून जात असताना टोलनाक्यावरील आणखी काही वाहनांना कारने उडवले.
या अपघातात कारचालकही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीच्या धडकेनंतर कारचा वेग आणखी वाढला आणि टोलनाक्यावर आणखी काही वाहनांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
Road Accident : कर्नाटकात तीन भीषण अपघात! दोन ठार तर 9 जण जखमी
रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.