Rohit Pawar On Rahul Narwekar : राज्यातील सत्तासंघर्षाचा मुद्दा पुन्हा उफाळून समोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी वेळ दिला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar)काहीच कार्यवाही केली नाही. त्याविरोधात शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray group)गटाने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)विधानसभा अध्यक्षांना चांगलेच फटकारले.
Rashmika Mandana Look: रश्मिका मंदानाचा Animal मधील फर्स्ट लुकनं इंटरनेटचा पारा चढला …
त्यानंतर शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रक्रियेला गती आली आहे. त्यावरुन विरोधकांनी अध्यक्षांवर जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पवार म्हणाले की, जर अपात्रतेच्या प्रक्रियेला वेळ लागणार असेल, तर तीन महिन्यांमध्ये विधानसभा अध्यक्षांनी काय केलं असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
Sharad Ponksheनी सांगितला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचा ‘तो’ किस्सा; म्हणाले, ‘नाटकाची बस जाळली…’
रोहित पवार (Rohit Pawar)म्हणाले, राहुल नार्वेकर आमचे अध्यक्ष आहेत. त्यांचा आदर आम्हा सर्वांना आहे. असं असलं तरी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी ही आपल्या पक्षाच्या बाजूने नसते, तर राज्याच्या हिताच्या बाजूने असते. राज्याचं हीत लक्षात घेऊन लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे,जो अध्यक्षांकडून होत नाही.
दुसरी दुर्देवाची गोष्ट म्हणजे, स्वाभीमानी महाराष्ट्राचे अध्यक्ष असतानाही त्यांना दिल्लीला जाऊन मार्गदर्शन घ्यावं लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभीमान टिकवण्याची जपण्याची जबाबदारी ही राहुल नार्वेकर यांची देखील आहे.
त्याचवेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतल्याबद्दल विचारले त्यावर रोहित पवार म्हणाले की, घेतली असेल भेट त्यात काय एवढं आश्चर्य वाटण्याची गरज नाही.
पवारसाहेब अंबानींनाही भेटतात, अदानींनाही भेटतात. छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात, एकदम छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. आणि या सर्वांना भेटल्यानंतरच आपल्या राज्याचा विकास कसा करता येईल? याबद्दल कुठंतरी चर्चा करता येत असते. त्याच्यावर आपल्याला पॉलिसी करता येते. समाजातील सगळ्या घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी ही करता येत नाही असेही आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले.