Saif Ali Khan : सैफ अली खानच्या हल्लेखोराचा एफआरटी अहवाल उघड, धक्कादायक सत्य उघड

25 जानेवारी रोजी सरकारी वकील के.एस. पाटील आणि प्रसाद जोशी यांनी पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगितले की, आरोपीच्या चेहऱ्याची

Saif Ali Khan : सैफ अली खानच्या हल्लेखोराचा एफआरटी अहवाल उघड, धक्कादायक सत्य उघड

Saif Ali Khan : सैफ अली खानच्या हल्लेखोराचा एफआरटी अहवाल उघड, धक्कादायक सत्य उघड

Actor Saif Ali Khan Assault Case : अभिनेता सैफ अली खानवर (दि. 16 जानेवारी)च्या मध्यरात्री झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 19 जानेवारीला आरोपीला अटक केली होती. (Saif Ali Khan) बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर असे आरोपीचे नाव आहे. हल्ला झाल्यानंतर हा आरोपी सैफच्या घरातून पळून गेला तेव्हा त्याचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता, त्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक केली.

हल्ल्यानंतर सैफ-करिना अलर्ट, मुलांच्या सुरक्षिततेसाठी घेतला हा  निर्णय

सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती शरीफुल आहे का?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अटक करण्यात आलेली व्यक्ती आणि सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती वेगळी असल्याचंही काही लोकांनी सांगितलं. अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांनीही आपल्या मुलाला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात येत असल्याचं सांगितले. यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपीची फेशियल रिकग्निशन टेस्ट (एफआरटी) करण्याचा निर्णय घेतला. आता एफआरटीचा अहवाल समोर आला असून त्यात धक्कादायक सत्य समोर आली आहे.

25 जानेवारी रोजी सरकारी वकील के.एस. पाटील आणि प्रसाद जोशी यांनी पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगितले की, आरोपीच्या चेहऱ्याची ओळख पटवणं आवश्यक आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची फेशियल रेकग्निशन टेस्ट (एफआरटी) केली. ज्याचा अहवाल आता समोर आला आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शरीफुलचा चेहरा आणि सैफच्या घरात सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या आरोपीचा चेहरा ओळख चाचणीत आढळून आला. म्हणजेच पोलिसांनी अटक केलेला आरोपी तोच आहे जो चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसला होता आणि त्याने अभिनेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता.

Exit mobile version