Download App

Sachin Tendulkar च्या घराबाहेर ऑनलाईन गेम जाहिरात प्रकरणी आंदोलन; बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

Sachin Tendulkar : मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) विरोधात प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी सचिनविरोधात दंड थोपटल आहेत. सचिन ऑनलाइन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. सचिन तेंडुलकरच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे कडू म्हणाले होते. त्यानुसार आज बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यामुळे पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

Toordal Price Hike : ऐन सणासुदीत डाळी महागल्या 100 रुपयांची तूरडाळ 170 रुपयांवर

बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात…

पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर ठीय्या आंदोलन सुरू केले आहे. सकाळी बच्चू कडू यांनी सचिनच्या घराबाहेर आंदोलन केलं. त्यात त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सचिन विरोधात घोषणाबाजी केली. तसेच हातात सचिनविरोधातील पोस्टर घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

Rajkummar Rao Birthday: एकेकाळी पार्ले-जी खाऊन उदरनिर्वाह करणारा हा अभिनेता आता बनलाय सुपरस्टार

काय म्हणाले बच्चू कडू?

या आंदोलनावेळी बच्चू कडू यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, सचिन तेंडुलकरचे चाहते खुप आहेत. त्यामुळे तो करत असलेल्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातींचा परिणाम लहान मुलांवर होत आहे. त्यामुळे आमची मागणी आहे. की, सचिनने ऑनलाईन गेमच्या जाहिरातींतून बाहेर पडावं. नाही तर भारतरत्न परत करावा. ते जर झालं नाही तर येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये प्रत्येक मंडळामध्ये आम्ही सचिनसाठी दानपेटी ठेवणार आहोत. त्यात येणारे पैसे सचिनला दिले जाणार. असं म्हणत बच्चू कडू सचिनच्या ऑनलाईन गेमच्या जाहिरात प्रकरणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

.. तर आम्ही आंदोलनही केलं नसतं
राज्यात ऑनलाइन गेम बंद व्हावा यासाठी आम्ही विरोध करत आहोत. जाहिरातीला विरोध करत आहोत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) तुम्ही भारतरत्न आहात. त्यामुळेच आमचा त्यांनी ऑनलाइन गेमची जाहिरात करण्यास विरोध आहे. ते जर भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलनही केलं नसतं, असेही त्यांनी स्पष्ट केले. सचिन तेंडुलकरने या जाहिरातीतून माघार घ्यावी यासाठी आम्ही त्यांना पंधरा दिवसांची मुदत देऊ त्यानंतर मात्र घरासमोरच आंदोलन करू, असा इशाराही कडू यांनी दिला होता.

Tags

follow us