Download App

सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला, पण छत्रपतींचा नाही…; संभाजीराजेंचा सरकारवर हल्लाबोल

केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार, मग स्मारक का होत नाही? पटेलांचा पुतळा उभा राहिला. मग महाराष्ट्रात छत्रपतींचा पुतळा अजून का उभा राहिला नाही?

  • Written By: Last Updated:

Sambhaji Raje : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2016 मध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते. मात्र त्या स्मारकाचे काम अद्यापही सुरू झालं नाही. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वंशज आणि स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे (Sambhaji Raje) चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी रविवारी अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी कऱण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

‘मराठी’ला अभिजात दर्जा; सचिन तेंडूलकरची लक्ष वेधून घेणारी पोस्ट 

केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार, मग स्मारक का होत नाही? गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला. मग महाराष्ट्रात छत्रपतींचा पुतळा अजून का उभा राहिला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संभाजीराजे छत्रपती हे सरकारने आठ वर्षांपूर्वी अरबी समुद्रात जलपूजन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा शोध घेण्यासाठी निघाले आहेत. संभाजीराजे कार्यकर्त्यांसह मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात दाखल झाले. मात्र पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. यावेळी पोलिसांकडून स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. त्यानंतर संभाजी राजे यांनी पोलिसांशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार, मग स्मारक का होत नाही? गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला. मग महाराष्ट्रात छत्रपतींचा पुतळा अजून का उभा राहिला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जसा अविवेकी नेता तसेच त्यांचे अविवेकी कार्यकर्ते, दीपक चौधरींचे विवेक कोल्हेंवर टीकास्त्र 

पुढं बोलतांना ते म्हणाले, पंतप्रधानांच्या हस्ते जेव्हा एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन केले जाते. तेव्हा त्याच्या सर्व परवानग्या असणे गरजेचं होतं. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मग कुठं आहे हे स्मारक? त्यामुळे आम्ही स्मारक शोधण्यासाठी मोहीम सुरू केलीये. सरकारने राज्यातील 13 कोटी जनतेला उत्तर द्यावे, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

बोटवाल्यांना भाजपकडून धमक्या…
स्माकराच्या ठिकाणी असलेले आमचे बोर्ड काढून टाकले आहेत. परंतु महायुतीचे बोर्ड तसेच आहेत. आम्ही समुद्रात स्मारकाच्या पाहणीसाठी जाणार आहोत. परंतु, ज्या बोटने जाणार आहोत, त्या बोटवाल्यांना भाजपकडून धमक्या दिल्या जात आहे. त्यांनी परवाना रद्द करण्याची धमकी दिली गेली. पण, आम्ही धमक्यांना घाबरणार नाही. जिथपर्यंत आम्हाला परवानगी आहे, तिथपर्यंतच जाणारच आहोत, असंही संभाजीराजे म्हणाले.

मोदींनी महाराष्ट्र सरकारला जाब विचारावा…

आठ वर्षांत काहीच काम झालं नाही. मोदींनी महाराष्ट्र सरकारला जाब विचारला पाहिजे. माझ्या हस्ते जलपूजन करूनही काहीच काम का झाले नाही? राज्यातील जनतेची फसवणूक झाली आहे. आज आम्ही शिवरायांच्या स्मारकाचा मुद्दा घेतला. पण इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत पण हीच भूमिका आहे, असंही ते म्हणाले.

मी 5 वर्षे खासदार होता, त्यावेळी या स्मारकासाठी पाठपुरावा केला होता. ही माझी राजकीय भूमिका नाही. गडकोट किल्ल्यांची अवस्था वाईट आहे. माझा कोणालाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न नाही, असंही ते म्हणाले.

follow us