Sameer Bhujbal on Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील सांताक्रूझ पश्चिम येथील छगन भुजबळ यांची इमारत फर्नांडिस कुटुंबीयांच्या जमिनीवर बांधली असून या कुटुंबाला भुजबळांनी एक पैसाही दिला नाही. फर्नांडिस कुटुंबीय वर्षानुवर्षे संघर्ष करत आहेत पण भुजबळ त्यांना दाद देत नाहीत, असे आरोप केले. या आरोपांचे आता समीर भुजबळ(Sameer Bhujbal) यांनी खंडन केलं.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून खेचू; प्रकाश शेंडगेंचा इशारा
भुजबळ म्हणाले, सांताक्रूझ येथील आमच्या घराबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, ही जागा बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची असून फ्रान्सिस फर्नांडिस हे लीज होल्डर होते. त्यांनी त्यांची मुलगी शैला अथयडे यांना लिझचे हक्क दिले. म्हणजेच त्या या जागेच्या खऱ्या मालक होत्या व त्यांनी या जागेसंबंधी हक्क त्यांच्या भावांना दिले होते. या प्रकरणी कोर्टात फर्नांडिस कुटुंबाने कन्सेंट टर्म्स फाईल करून सर्वप्रथम मेसर्स पाल्म शेल्टर्स ह्या रहेजा बंधूंच्या कंपनीसोबत व्यवहार केला होता. त्यांनी 10 वर्षे काहीही काम केले नसल्यानं फर्नांडिस हे नव्या डेव्हलपर्सच्या शोधात होते. फ्रेडरिक नर्होणा या सोसायटीच्या सचिवांना नवीव डेव्हलपर्स शोधावा, यासाठी विनंती केली. त्यानुसार आमच्या कंपनी मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या संपर्कात ते आले. त्यांनी सर्व विषय मांडला होता.
ते म्हणाले की, फर्नांडिस कुटुंबिया्ंना त्याच सोसायटीत इतरत्र फ्लॅट देण्याच्या करारानुसार, आमच्या कंपनीने मेसर्स पाम शेल्टर्स आणि फ्रेडरिक नारहोना यांना संपूर्ण पेमेंट केले. त्या बदल्यात, आमच्या कंपनीला सादर केलेल्या जागेशी संबंधित सर्व अधिकार प्राप्त झाले. मोबदला दिल्यानंतर सप्टेंबर 2003 मध्ये श्री व सौ. फर्नांडिस यांनी आमच्या परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या नावे रजिस्टर सुध्दा केली होती. तथापि, 2005 मध्ये बांधकाम सुरू केल्यानंतर, आमचे फ्रेडरिक नर्होणा ह्यांच्याशी पटत नाही. या कारणास्तव त्यांनी करार रद्द करावा, अशी भूमिका घेतली. आम्ही फ्रेडरिक नर्होणा यांच्याशी संपर्क साधला असता बांधकाम सुरू असून लवकरच ताबा देण्यात येईल, असे सांगण्यात आले. पण फर्नांडिस कुटुंबाने फ्रेडरिक नर्होणा यांच्याकडून फ्लॅट घेण्यास नकार दिला, असेही भुजबळ म्हणाले
आमचं कोणतंही देण लागत नसतांना माणूसकीच्या नात्याने फर्नांडिस कुटुंबाशी वारंवार संपर्क साधला.2014 त्यांनी समक्ष भेटून फ्लॅटच्या मोबदल्यात पैसे देण्याचे आम्ही मान्य आणि त्यांनी देखील मान्य केले. त्यासाठी परवेश कन्स्ट्रक्शनच्या नावे लीज हस्तांतरित करावी, असे पत्रही बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्टला दिले होते. मात्र त्यावेळेस फर्नांडिस यांनी व्यवहार पार पाडला नाही. आणि पुन्हा पैसे घेण्यास नकार दिला. नंतरच्या काळात आमच्यावर ओढवलेली संकटे पाहत फर्नांडिस कुटुंबीय न्यायालयात गेले. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत ट्र्याबूनल (योग्य त्या कोर्टात दाद मागायला ) मध्ये जायला सांगितले.
मात्र त्यानंतरही त्यांनी ट्र्याबूनलमध्ये दाद मागितली नाही. दरम्यान, अंजली दमानिया या फर्नांडिस कुटुंबियांना पुढं करून यात राजकारण करत राहिल्या.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी अंजली दमानिया यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. याबाबत आम्हाला विचारले असता आम्हालाही सकारात्मक उत्तर मिळाले. आम्ही 50 लाख रुपयांचा धनादेश बिनशर्त देऊ केला. त्यांनी तो स्वीकारला. परंतु, बॅंकेत जमाकेला नाही किंवा त्यांना जमा करू दिला नसावा.
सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्थीमुळे आणि फर्नांडिस यांच्या वयाचा विचार करून, आम्ही करारानुसार त्यांच्याकडून पूर्ण करायच्या असलेल्या जवळपास सर्व मागण्या किंवा अटी रद्द केल्या आणि वकिलांच्या सल्ल्याविरुद्ध रिलीझ डीड साऱखे एखादे करारपत्र करावे व ईडी ट्रिब्युनलमध्ये परवानगीसाठी जवे लागू शकते, त्यात त्यांनी सहकार्य करावे, असं ठरले. व त्यांच्या फ्लॅटच्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्याचे ठरले होते. मात्र, आम्ही दिलेले पैसे देखील त्यांनी नाकारले.