Download App

Samruddhi Highway वर अपघातांचं सत्र सुरूच; भीषण अपघातात तीन ठार, दोन गंभीर जखमी

Samruddhi Highway ज्याप्रमाणे गतिमान प्रवासासाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण देखील तेवढेच आहे.

Samruddhi Highway Accident : राज्यातील समृद्धी महामार्ग ( Samruddhi Highway ) ज्याप्रमाणे गतिमान प्रवासासाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे या महामार्गावर अपघातांचे ( Accident ) प्रमाण देखील तेवढेच आहे. त्या महामार्गावर आज सकाळी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. मुंबई कॅरिडोरवर चॅनेल क्रमांक 304 या ठिकाणी हे घटना घडली. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी आहेत.

विखेंची कॉंग्रेसमध्ये येण्यास धडपड सुरू; आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ तर थोरातांनीही दिला दुजोरा

या अपघातामध्ये मृत पावलेले लोक हे छत्तीसगडमधील रहिवासी आहे. यामध्ये एक जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर मृत पावले आहेत. पोलिसांकडून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. या मृतांमध्ये लताबाई पुरुषोत्तम मेहेर, मुकेश अनुज राम मेहेर आणि आत्मजा मुनोरबोद या तिघांचा समावेश आहे.

Horoscope Today:  वृषभ, कन्या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; आजचे राशीभविष्य जाणून घ्या

तसेच या महामार्गावर सतत अपघातांचं सत्र सुरू आहे. या अगोदर भरधाव कार ट्रकवर जोरात धडकल्याने समृद्धी महामार्गावर मुंबई कॅरिडॉर वरील चेनेज 301 जवळ भीषण ( Accident) अपघात झाला होता. त्यामध्ये तिघेजण गंभीर जखमी ( Three Seriously Injured ) झाले होते. दरम्यान समृद्धी महामार्गावर ट्रक चालक कुठलाही इशारा न देता अचानक लेन बदलत असतात. त्यामुळे या महामार्गावर वारंवार असे अपघात घडले च्या घटना समोर येत आहेत.

अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील 4 जण ठार…

वाशिम रोडवर (Washim Road) दोन कारची एकमेकांना जोरदार धडक झाली. यात एक कार अमरावतीचे (Amravati) शिक्षक आमदार किरण सरनाईक (MLA Kiran Sarnaik) यांच्या भावाची होती. या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा मुत्यू झाला. मुत्यू झालेल्या नागरिकांमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील 4 जणांचा समावेश होता.

follow us