तोंडाला मास्क, हातात रॉड घेऊन आलेल्या अज्ञातांकडून संदिप देशपांडेंवर हल्ला

मुंबई : मॉर्निंग वॉकला गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संदिप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शिवाजी पार्कवर ही घटना घडली आहे. हल्ल्यात देशपांडे जखमी झाले असून त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडालीय. जनादेशाचा स्वीकार करत फडणवीस म्हणाले, आम्ही पुन्हा येऊ! तोंडाला मास्क लावून आलेल्या काही लोकांनी […]

Sandip

Sandip

मुंबई : मॉर्निंग वॉकला गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संदिप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शिवाजी पार्कवर ही घटना घडली आहे. हल्ल्यात देशपांडे जखमी झाले असून त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडालीय.

जनादेशाचा स्वीकार करत फडणवीस म्हणाले, आम्ही पुन्हा येऊ!

तोंडाला मास्क लावून आलेल्या काही लोकांनी संदिप देशपांडे यांना शिवाजी पार्क परिसरात मारहाण झालीय. मॉर्निंग वॉक करीत असतानाच अचानक अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पने मारहाण करण्यात आळीय. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले.

हल्ला झाल्यानंतर शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी देशपांडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा हल्ला झाल्यानंतर तत्काळ मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले आहेत. संदीप देशपांडे रोज पहाटे शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला जात असतात. त्याप्रमाणे ते आजही मॉर्निंग वॉकला गेले होते. शिवाजी पार्कात सकाळी बरीच गर्दी असते.

दरम्यान, एवढ्या गर्दीच्या ठिकाणी देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. देशपांडे हे आपल्या रोखठोक राजकीय मतांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या राजकीय स्टेटमेंटमुळे ते नेहमीच वादात असतात. त्यामुळे त्यांच्या हल्ल्यामागे काही राजकीय धागेदोरे आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. देशपांडे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

Exit mobile version