जनादेशाचा स्वीकार करत फडणवीस म्हणाले, आम्ही पुन्हा येऊ!

जनादेशाचा स्वीकार करत फडणवीस म्हणाले, आम्ही पुन्हा येऊ!

पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad By Election) भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी गड राखलाय. त्या विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी त्यांचं ट्वीटद्वारे अभिनंदन केलंय. त्याचवेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार देखील मानले आहेत. त्याचवेळी फडणवीसांनी कसबा (Kasba)मतदारसंघातील पराजयाबद्दल नाराजी व्यक्त करत जनादेशाचा स्वीकार करतो पण आपले आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ असंही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, चिंचवड विधानसभा क्षेत्रातून आमच्या भाजपा उमेदवार अश्विनीताई जगताप या विजयी झाल्या. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विकासाला साथ देणाऱ्या चिंचवडवासियांचे मनापासून आभार! स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना ही भावपूर्ण आदरांजली आहे.

उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांनी केली ‘ही’ मागणी

त्याचबरोबर कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’! अशा आशयाचं ट्वीट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

चिंचवड मतदारसंघात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी 36 हजारांच्या मताधिक्यानं विजय मिळवलाय. चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांचं आव्हान होतं. महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) या निवडणुकीत कलाटेंच्या बंडखोरीचा फटका बसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube