Download App

Sanjay Kelkar : ठाण्यातील हुक्का पार्लरविरोधात भाजप आमदार आक्रमक, पोलिसांचं धाडसत्रही सुरू

Sanjay Kelkar on Hookah Parlour : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये पोलिसांनी बेकायदेशीर हुक्का पार्लरवर धाडी टाकायला सुरू केले आहे. त्यामध्ये आता भाजप आमदार संजय केळकर यांनी देखील उडी घेतली आहे. अशा पार्लरवर अचानक धाडी टाकण्यासाठी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फौज सज्ज केली आहे.

Anil Deshmukh यांनी चौदा महिन्यांच्या जेलवारीनंतर मिळवला मोठा विजय

चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ह्या धाडी टाकण्यात येत आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून आमदार संजय केळकर यांनी तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिसांना वारंवार तक्रारी केल्या तर अधिवेशनातही आवाज उठवला आहे. परिणामी शहरातील विशेषत: घोडबंदर पट्ट्यातील हुक्का पार्लरवर धडक कारवाई सुरू झाली आहे.

Pune Cyber Crime : ‘मॅट्रिमोनियल’ साईटवर भावी पतीचा शोध पडला महागात, तरुणीला घातला लाखोंचा गंडा

चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिनेवंडर मॉलमधील द मिंट, हिरानंदानी मेडोजमध्ये लाउंज 18, कोठारी कंपाऊंडमधील द सेक्रेड आणि ऑसर हॉस्पिटलशेजारील हँग आऊट क्लब येथे वारंवार अचानक धाडी टाकण्यात येऊन त्याची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी आमदार संजय केळकर यांना लेखी दिली आहे. या आस्थापनांवर 2022 मध्ये आठ गुन्हे आणि 2023 मध्ये चार गुन्हे दाखल केले आहेत. यातील चार गुन्हे तपासाधीन असून चार प्रकरणे न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

समीर वानखेडे प्रकरणात नाना पटोलेंनी सरसंघचालकांना ओढले…

ठाण्यात हुक्का पार्लरला परवानगीच नसून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून फास्ट ट्रॅकवर ही प्रकरणे चालवावीत, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. हुक्का पार्लरमुक्त ठाणे ही चळवळ यापुढेही सुरू राहणार असून नागरिकांचाही पाठिंबा या चळवळीला वाढू लागला असल्याची माहिती केळकर यांनी दिली. ठाणे शहर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर असून येथील तरुणांची पिढी उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरु असून बेकायदेशीर हुक्का पार्लर चालकांकडून होत आहे. या विरोधात आमदार संजय केळकर यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या नेतृत्वाखाली तरुण कार्यकर्त्यांची फौज सज्ज झाली आहे.

Tags

follow us