‘फडवणीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती; राज्यात लवकरच डॉक्टरांचं मंत्रीमंडळ होणार’

Sanjay Raut Press : राज्याचे मुख्यमंत्री सध्या डॉक्टर झाले आहेत. आज मुख्यमंत्री, उद्या फडणवीस, अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी सगळे डॉक्टर होतील आणि मग डॉक्टरांचं मंत्रीमंडळ तयार होईल, असा टोला संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज्य सरकारला लगावला आहे. देवेंद्र फडवणीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती असून, आम्हाला ही डॉक्टरकी नको, आम्ही त्या लायक नसल्याचेही […]

Letsupp Image   2023 12 26T112232.540

Letsupp Image 2023 12 26T112232.540

Sanjay Raut Press : राज्याचे मुख्यमंत्री सध्या डॉक्टर झाले आहेत. आज मुख्यमंत्री, उद्या फडणवीस, अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी सगळे डॉक्टर होतील आणि मग डॉक्टरांचं मंत्रीमंडळ तयार होईल, असा टोला संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज्य सरकारला लगावला आहे. देवेंद्र फडवणीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती असून, आम्हाला ही डॉक्टरकी नको, आम्ही त्या लायक नसल्याचेही राऊतांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी राम मंदीर उद्धघटन आणि अन्य मुद्द्यांवरूनही जोरदार हल्लाबोल केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दादांनी केंद्राला दरारा दाखवून निर्यातबंदी उठवावी; पवारांच्या भेटीनंतर कोल्हेंचाही बदलला ‘मूड’

देशात एकच व्यक्ती VIP

यावेळी राऊतांनी राम मंदिराच्या उद्घाटनावरून भाजपवर जोरदार टीका केली. भाजपकडून जारी करण्यात आलेल्या पोस्टरवरूनही राऊतांनी हल्लाबोल केला. राऊत म्हणाले की, राम मंदिरात जाणारा हा भक्त असतो, पण या देशात एकच व्हीआयपी आहेत आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी. हे भगवान विष्णूचे 13 वे अवतार प्रभू श्रीरामाला मोदी बोट धरून मंदिरात नेत आहेत असे पोस्टर भाजपाने लावले आहेत. ज्यांनी पोस्टर लावले त्यांनी आधी यावर बोलावे कोण व्हीआयपी व कोण सामान्य आहेत असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.

आम्ही सामान्य म्हणून राम मंदिराच्या लढ्यात उतरलो तेव्हा आजचे व्हीआयपी कुठे गेले होते. राम मंदिर पाडले तेव्हा ही लोकं कुठे होते? असा प्रश्नदेखील राऊतांनी भाजपच्या नेत्यांना विचारला आहे. बाबरीचे घुमट कोसळताच जे पळून गेले, हे आमचे काम नाही म्हणणारे आता छाताडाची भाषा करत असून, सत्तेमुळे छाताडं आता फुगली असतील तेव्हा तुमची छाताडं कुठे गेली होती? तुमची छाती आगोदर मोजा असे म्हणत सत्तेचा माज आणि रामभक्ती आणि हिंदुत्व आम्हाला शिकवू नका असा सल्ला राऊतांनी फडणवीसांना दिला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली होती असे सांगत अयोध्येतील घटनेनंतर मातोश्रीवर कशा बैठका होत होत्या याबाबत अशोक सिंघल यांना विचारा असा सल्लाही राऊतांनी दिला आहे.

Ajit Pawar : ‘मी शिरुरबाबत जे सांगितलं तेच फायनल’; थेट मतदारसंघात येत अजितदादांनी ठणकावलं!

तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत; आमंत्रणाची गरज नाही 

येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार असून, या भव्य कार्यक्रमासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण दिले जात आहे. यात राजकारणी, खेळाडूंसह महत्त्वाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलेले आहे. मात्र, ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अद्यप निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक आरोप्रत्यारोप केले जात आहे. यावरही राऊतांनी भाष्य केले. ते म्हणाले की,  2024 नंतर कुणाचे हिंदुत्व आहे ते दिसेल. बाबरी पाडल्याचे खापर भारतीय जनता पक्षाने घाबरून शिवसेनेवर फोडले असून, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्याची गरज नाही तुमच्या आधीपासून आम्ही अयोद्धेत असून, आम्ही सर्व जण अयोध्येत जाऊ असे राऊतांनी सांगितले.

मोदींचा पराभव झाला नाही तर, सर्वांना तिहार जेलमध्ये जावं लागेल

यावेळी राऊतांनी वंचित बहुज आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी होण्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू असून, 24-24 हा त्यांचा सुरूवातीपासूनचा प्रस्ताव आहे. वंचितला आम्ही सन्मानाने सामिल करून घेणार असून, 2024 मध्ये मोदींचा पराभव झाला नाही तर, सर्वांना तिहार जेलमध्ये जावं लागेल, ही प्रकाश आंबेडकरांची तीव्र भावना आहे. लोकशाही वाचविण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी प्रकाश आंबेडकरांवर असल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.

नटाचं दुःख अन् सिनेमा पलीकडचे नाना…

 

Exit mobile version