Download App

Shital Mhatre यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन संजय राऊतांनी बंडखोरांना डिवचले

मुंबई : शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर गटाला आव्हान देत खुलासा करण्याची मागणी करत असतांना शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ दिला. बंडखोर गटाने एकदा स्पष्ट करावे, की ते शिवसेना सोडून का गेले, त्यांना महाविकास आघाडी नको म्हणून सोडून गेले का ? हिंदुत्वासाठी सोडून गेले का ? खोके मिळाले म्हणून सोडून गेले का ? का माझ्या धमक्यांना घाबरून गेले ? प्रत्येक वेळी भूमिका बदलत असतात, म्हणून एकदा स्पष्ट करावे, असे शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटलं आहे.

यावेळी बोलतांना दहिसर येथील भाषणाचा आधार घेत शीतल म्हात्रे यांनी गुवाहाटीला जे पळून गेले होते, त्यांना दंडुक्याने मारा, त्यांच्या पार्श्वभागावर पठके द्या, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या होत्या, याविषयी संजय राऊत यांनी बंडखोर गटावर जोरदार हल्लाबोल करत असतांना शीतल म्हात्रे यांना डिवचलं आहे. यावेळी त्यांनी संजय गायकवाड यांच्या टिकेविषयी विचारतांना फालतू लोकांवर बोलत नाही, म्हणून बोलणं टाळलं.

अर्थसंकल्पात घोषणा फार असतात. एवढीच अपेक्षा आहे की, दोन-पाच उद्योगपतींना, कॉर्पोरेट विश्वाला समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला जाऊ नये. या देशामध्ये शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, मजूर आहेत. ते आज देखील न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलं, तर त्याचं स्वागत केले जाईल. नाहीतर दोनजण खरेदी करतात, दोनजण विकतात असं जे राहुल गांधी म्हणतात, फक्त दोघांसाठी देशाची अर्थव्यवस्था राबवली जात असते, यामुळे हा देश आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात जाणार आहे. ती सध्या जातच आहे, अशी टीका संजय राऊतांनी मोदी सरकारवर केली.

Tags

follow us