Download App

Maharashtra Politics : अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांनी सुनावलं

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री स्वत:ला क्रांतिकारक समजत आहेत. क्रांतिकारक घाबरत नसतात. यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचं आव्हान स्विकारावं. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आदित्य यांच्या समोर लढावं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक एकत्र लढणार असल्याचे यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.

अजित पवार यांनी शिवसेनेत उद्भवलेल्या बंडाविषयी मोठा गौप्यस्फोट केला होता. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेत होणाऱ्या बंडाविषयी अगोदरच सावध करण्यात आलं होतं. स्वत: शरद पवार यांनी या गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या. मी देखील सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि जे व्हायला नको होतन नेमकं तेच झालं शिवसेनेत फूट पडल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आता या वक्तव्याला संजय राऊत यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.

शिवसेनेत होणाऱ्या बंडाचा आम्हाला अगोदरच सुगावा लागला होता. आम्ही देखील उद्धव ठाकरे यांना बंडाविषयी वेळोवेळी सांगत होतो. मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवला असं संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील जोरदार टोला लगावला. एकनाथ शिंदे हे बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलेत. मुख्यमंत्री स्वत:ला क्रांतिकारक समजतात. क्रांतिकारक घाबरत नाहीत, यामुळे आता शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि ३२ वर्षांच्या तरुणाचं आव्हान स्विकारून निवडणूक लढवावी असं संजय राऊत यांनी यावेळी म्हणाले.

Tags

follow us