Sanjay Raut On Rahul Narvekar: उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) अशी भूमिका आहे की, देशाच्या राजधानीकडे हजारो शेतकरी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश त्या भागातून निघाले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर खिळे ठोकणे, सशस्त्र पोलिसांना उभे करणे, हजारो लाखो भिंती उभ्या करणे, अडथळे उभे करणे, या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये लोकशाहीतून निवडून आलेल्या सरकारला (Government) आणि जे सरकार शेतकऱ्यांनी निवडून दिले आहे, त्या सरकारला हे शोभत नाही. अशी खोचक टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, हा संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचा आवाज आहे. पंजाबचे शेतकरी संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचा आवाज उठवत आहेत, अशी भूमिका उद्धव ठाकरेंची आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रात कस योगदान देऊ शकेल? या विषयी त्यांच्या मनामध्ये काय विचार आहेत? लवकर ते भूमिका आम्ही स्पष्ट करू. 2014 पासून सातत्याने मोदी शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, अशी मागणी करत आहेत.आणि् गुजरातचे मुख्यमंत्री असताना एक जो कार्यगट निर्माण केला होता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्याचा एक अहवाल मोदींच्या नेतृत्वाखाली तयार झाला आणि तो अहवाल नरेंद्र मोदी त्यांनी मनमोहन सिंह यांना सादर केला.आम्हाला सुद्धा मोदींची शिफारस आहे की, शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळाला पाहिजे. असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला.
पुढे म्हणाले की जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी आम्हाला वाटते. उद्धव ठाकरे आज आणि उद्या जनसंवाद दौऱ्यावरती निघाले होते. पण मराठवाड्यात, धाराशिव आणि आसपास आज आम्ही तो दौरा तूर्तास स्थगित केला आहे. कारण जारांगे पाटील यांची प्रकृती बरी नाही. लोकांमध्ये अस्वस्थता आणि चिंता आहे, यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि ते लक्षात घेता आम्ही दौरा रद्द केला आहे.असे यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले
मोठी बातमी : निवडणुकीपूर्वीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार; 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन
ज्या महाराष्ट्रात मराठी चैनलवर एक प्रोग्राम चालतो, तो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. खूप कॉमेडी आहे. हास्यजत्रा आम्ही सगळेजण बघतो.राहुल नार्वेकर यांनी एका नवीन हास्यजत्रेचा एपिसोड लिहिला आहे. खरी शिवसेना जी बाळासाहेब ठाकरे यांची आहे, ती शिंदे यांना दिली. शरद पवार ते अजून आहेत, त्यांची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ती अजित पवार यांना दिली. यावर सध्या लोक हसत आहेत. हास्यजत्रा आहे, हास्यजत्रा सुरू आहे. असा खोचक टोला राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) राऊतांनी लगावला.