मुंबई : नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) या दोन कडवट हिंदू नेत्यांचं देशात राज्य सुरु आहे. राज्यात देखील हिंदुंचं राज्य आलं असं सांगण्यात येत आहे. तरीपण राज्यात आक्रोश मोर्चा निघत आहे. हा आक्रोश मोर्चा योग्यच आहे. कारण स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून हिंदूंना न्याय मिळत नाही. ती भाजपचीच रॅली होती. तो काही हिंदू जनआक्रोश वगैरे नव्हता. लोकांचा असा गैरसमज आहे, की तो मोदींच्या विरोधातील आक्रोश होता. अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केली.
भाजपमध्ये मोदी, शहा, फडणवीस यांच्या सारखे कडवट नेते असताना लवजीहाद होत असेल तर हे योग्य नाही. या देशात शक्तीमान हिंदू नेत्यांचं राज्य असताना काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित न्याय मागण्यासाठी आक्रोश करत आहेत. ज्या मुलायमसिंह यादव यांनी राम सेवकांवर गोळ्या चालवल्या त्यांचा निषेध करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. यामुळं या आक्रोश मोर्चाचं स्वागत करायला पाहिजे, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटंलं आहे.
मुंबईत आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातून हजारो लोक या मोर्चात सहभागी होत आहेत. मोर्चेकऱ्यांनी यावेळी शिवसेना भवनसमोर घोषणाबाजी केली. यावेळी त्यानी देशात स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं राज्य असताना असा मोर्चा काढावा लागणं हे दुर्देवाचं आहे. हिंदूंचा आवाज दाबला जात आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
या देशात स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही. यामुळे असे मोर्चे काढावे लागत आहेत. हे हिंदूंचं दुर्देव आहे. ८ वर्षांपासून हिंदू समाजाचा आक्रोश सुरू झालाय. मग हिंदूंना कुठं न्याय मिळाला. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित रस्त्यावर बसून न्याय मागत आहे. ज्या मुलायमसिंह यादव यांनी रामसवेकांवर गोळ्या झाडल्या त्यांचा नरेंद्र मोदी सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने गौरव केला. यामुळे या विरोधात आजचा आक्रोश मोर्चा आहे. असे आक्रोश मोर्चे निघाले पाहिजेत. कारण हिंदू समाजाचा आवाज दाबला जात आहे. यामुळे हा मोर्चा निघाला असेल तर चांगली गोष्ट आहे, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.